Sunday, December 29, 2024

/

केरळ व महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य

 belgaum

कोरोनासंदर्भात शनिवारी एक महत्त्वाची घोषणा करताना राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी केरळ आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. सदर निगेटिव्ह रिपोर्ट 72 तासापेक्षा जुना नसावा असेही स्पष्ट करून हवाईमार्गे येणाऱ्या प्रवाशांसाठी देखील हा नियम लागू करण्याचा राज्य सरकार विचार करत असल्याचे स्पष्ट केले.

कोरोना संदर्भातील शेजारील केरळ व महाराष्ट्र राज्यातील परिस्थितीमुळे कर्नाटकात धोक्याची घंटा वाजली आहे. कारण कर्नाटकचे चामराजनगर म्हैसूर, बेंगळूर, उडपी, कारवार आणि बेळगाव या जिल्ह्यांच्या सीमा केरळ व महाराष्ट्राला जोडलेले आहेत.

यासाठी सीमावर्ती चेक पोस्ट अर्थात तपासणी नाक्‍याच्या ठिकाणी आरोग्य खात्याने पोलिसांशी समन्वय साधून काटेकोरपणे प्रवाशांची कोरोना तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही मंत्री डॉ सुधाकर यांनी दिली.

आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी आज शनिवारी विधानसौध येथे आरोग्य खात्याच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन कोरोना परिस्थीतीचा आढावा घेतला. तसेच कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी राज्यातील समस्त जनतेला केले. सध्या कर्नाटक आणि विशेष करून बेंगलोरमध्ये कोरोना संदर्भातील परिस्थिती नियंत्रणाखाली आहे.

महाराष्ट्राप्रमाणे पुन्हा लाॅक डाऊन जारी करण्याची वेळ आपल्या राज्यावर येऊ नये, अशी आमची इच्छा आहे. सध्यातरी बेंगलोर अथवा संपूर्ण कर्नाटकात अंशता किंवा संपूर्ण लॉक डाऊन करण्याची कोणतीही योजना नाही. आमचे समस्त जनतेला आव्हान आहे आवाहन आहे की त्यांनी कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सुचीचे काटेकोर पालन करावे. सामाजिक अंतर पाळून मास्क वापरावेत असे आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.