Wednesday, December 25, 2024

/

टिळकवाडीतील स्पा मसाज सेंटर वर धाड दोघे अटकेत

 belgaum

 

बेळगावमधील टिळकवाडी परिसरात न्यू गेट वे युनिसेक्स स्पा नावावर सुरु असलेल्या मसाज सेंटरमध्ये अवैध प्रकार सुरु असल्याचे निदर्शनास आले असून बेळगाव सायबर पोलिसांनी या स्पा सेंटरवर धाड टाकून दोघांना अटक केली आहे.

स्पा सेंटर मध्ये अनैतिकरीत्या महिलांशी संबंध ठेवण्यात येत असल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सादर स्पा सेंटरवर पोलिसांनी धाड टाकून प्रकाश कन्नप्पा येळ्ळूरकर (वय 27 रा.मराठा कॉलनी टिळकवाडी ) आणि विनायक केदारी शिंदे (वय 37 रा. मरगाई गल्ली जुने बेळगाव) या दोघांना अटक केली आहे.Raid saloon tilakwadi

हाईट्स अपार्टमेंट काँग्रेस रोड बेळगाव न्यु गेट वे स्पा अँड सलून नावावर हे मसाज सेंटर सुरु होते. दरम्यान या मसाज सेंटरमध्ये तीन महिलांशी अनैतिक संबंध ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला असून या तीन महिलांची सुटका सायबर पोलिसांनी केली आहे. दरम्यान पोलिसांनी या स्पा सेंटरमधील अनैतिक गोष्टींसाठी वापरण्यात येणारे साहित्यदेखील जप्त केले आहे.Raid saloon tilakwadi

स्पा सेंटरसाठी परवानगी घेऊन मुलींशी अनैतिक संबंध ठेवण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांना आकर्षित करून स्पा सेंटरमध्ये अवैध गोष्टी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, अशी माहिती पोलीस उपयुक्त विक्रम आमटे यांनी दिली. सीईएन विभाग इन्स्पेक्टर गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली हि कारवाई पार पडली असून बेळगाव सायबर पोलीस विभागात हे प्रकरण दाखल करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.