Thursday, December 19, 2024

/

वाहनचोराला अटक; खडेबाजार पोलिसांची कारवाई

 belgaum

खडेबाजार पोलिसांनी केलेल्या कारवाईत वाहनचोराला अटक करण्यात आली असून त्याच्ययाकडून ४ वाहने जप्त केली आहेत.

खडेबाजार पोलिसांनी सदर कारवाई केली असून मलिकजान वाजिर पापा (वय १९, रा. ज्योतीनगर, मेन गल्ली, बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. यासंदर्भात खडेबाजार पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मारुती गल्ली येथे वाहनांची तपासणी करत असताना सदर युवक आणि त्याचा मित्र संशयास्पदरित्या वावरत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी सदर युवकांकडे असणाऱ्या वाहनांची तपासणी करताना अधिक माहितीसाठी पोलीस स्थानकात दोघांनाही आणण्यात आले. यावेळी हे वाहन चोरीचे असल्याचे उघडकीस आले.Khde bzar

पोलिसांनी पुढील तपास सुरु करताच अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून आणखी ३ वाहने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून एकूण चार वाहने जप्त करण्यात आली असून या वाहनांची अंदाजे रक्कम २ लाख रुपये इतकी आहे.

वरिष्ठाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आणि खडेबाजार पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक डी. बी. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय आर. बी. सौदागर आणि अपराध विभागाचे कर्मचारी एस. एम. शिंदे, व्ही. एस. कुंगारे, जे. एन. हंचीनमणी, बी. पी. उज्जीनकोप्प, आर. बी. गाणी, जी. पी. अंबी यांनी पोलीस स्थानक परिसरातील चोरीला गेलेल्या वाहनांची तपासणी करताना हि माहिती उघड झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.