मंगळवारी सायंकाळी केएसआरटीसी बस आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात गंभीर रित्या जखमी झालेला दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
वाघवडे – संतीबस्तवाड मार्गावर मंगळवारी सदर अपघात झाला असून या अपघातात गंभीर जखमी झालेल्या बेळगुंदी येथील नरेश पांडुरंग पावसकर (वय ३५) यांच्या रात्री १ च्या दरम्यान मृत्यू झाला.
दुचाकीवर असणारा पिराजी सातेरी चिरमुरकर (वय ३८) हा युवक अद्याप गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दुचाकीवरून दोघेही वाघवडे येथून बेळगुंदी या आपल्या गावी जाताना समोरून येणाऱ्या बसला दुचाकीची धडक बसली.
या धडकेत दुचाकीवरील दोघेही खाली कोसळले. दोघेही गंभीर रित्या जखमी झाले. यापैकी नरेश पावसकर हा कोमामध्ये होता. तर पिराजी चिरमुकर हा जखमी होता.
दोघांवरही उपचार सुरु होते. मात्र मंगळवारी रात्री नरेश पावस्करचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.