बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाबधित रुग्णांची संख्या पुन्हा स्थिर झाली असून जिल्ह्यात आज नव्या ६ कोरोनाबधितांची भर पडली आहे.
यामध्ये बेळगाव तालुक्यातील २, अथणी, खानापूर चिकोडी आणि रामदुर्ग तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. महाराष्ट्र, केरळमधील कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या चिंतेचे कारण बनत चालले असून कर्नाटकातही कोरोनाचा शिरकाव होईल याची धास्ती लागली आहे.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य खात्याच्यावतीने योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.
राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्यावतीने प्रसारित करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिन च्या आकडेवारीनुसार आज बेळगाव जिल्ह्यात ६ नव्या कोविड रुग्णांची वाढ झाली आहे. सध्या ९२ कोरोनाबाधित रुग्ण आयसोलेशन कक्षात दाखल असून आजपर्यंतच्या एकूण कोविड रुग्णांची संख्या २६८८३ इतकी आहे.
तर ३४२ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, केरळ राज्यात पुन्हा कोरोनाची धास्ती वाढली असून कर्नाटकात देखील कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.
सरकारने दिलेल्या मार्गसूचीनुसार प्रत्येकाने कोविड संदर्भातील सर्व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. २ दिवसांच्या कोविड रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत आजची आकडेवारी स्थिर आहे.