राज्य सरकारच्या बालस्नेही अंगणवाड्या आता अनेकांचे लक्ष बनू लागले आहेत. आकर्षक रंगरंगोटी करून मुलांना अंगणवाड्यांचे आकर्षण व्हावे या उद्देशाने तालुक्यासह जिल्ह्यात बालस्नेही अंगणवाड्याची निर्मिती सुरू झाले आहे. बेळगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी अशा अंगणवाड्या उपलब्ध झाले आहेत.
नुकतीच बेळगाव तालुक्यातील हिंडलगा व इतर ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या बालस्नेही अंगणवाड्यांच्या पाहणीसाठी जिल्ह्याचे प्रभारी सचिव एल. के. अतिक यांनी भेट देऊन या बालस्नेही अंगणवाड्यांचे कौतुक केले आहे. बेळगाव जिल्ह्यात ही योजना सुरू करण्यात आली असली तरी तालुक्यात मात्र ही योजना प्रभावीपणे राबविण्यात आली आहे. आतापर्यंत 20 हून अधिक ग्रामपंचायतीमध्ये बालस्नेही अंगणवाड्यांचे काम पूर्ण झाले आहे तर अजूनही काही काम शिल्लक आहे.
बेळगाव तालुक्यात बालस्नेही अंगणवाड्यांचे आकर्षित केलेली रंगरंगोटी त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ही शिकण्याची ऊर्मी निर्माण करण्याचे साधन बनत आहे. त्यामुळे बेळगाव तालुक्यात या कामाचे कौतुक करण्यात येत आहे. जिल्ह्याचे प्रभारी सचिव यांनी बेळगाव तालुक्यातील बालस्नेही अंगणवाड्यांची पाहणी करून अधिकार्यांची पाठ थोपटली आहे. अशाच प्रकारे काम करा आणि विकास साधा असे त्यांनी सांगितले आहे.
यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी मल्लीकर्जून कलादगी व शिक्षण खात्याचे अधिकारी उपस्थित होते. संपूर्ण तालुक्यात अशा प्रकारच्या अंगणवाड्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात येत आहे.