Saturday, April 27, 2024

/

सेल्फीचा मोह बेतला जीवावर पर्यटनासाठी गेलेल्या युवकाचा तिलारी येथे मृत्यू

 belgaum

तिलारी धरणाजवळ असलेल्या धबधब्यात पर्यटनासाठी गेलेल्या बेळगावमधील युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शास्त्रीनगर येथील ओंकार जगदीश दरवंदर (वय 20 वर्ष) हा तरुण आपल्या इतर 5 मित्र-मैत्रिणींसह पर्यटनासाठी गेला होता.

हे सर्व मित्र मैत्रिण पर्यटनासाठी तिलारीपासून साधारण दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका धबधब्याजवळ गेले होते.Tilari incident

 belgaum

सदर धबधबा हा सर्वसामान्यांच्या सहसा लक्षात न येण्यासारखा आहे. हे सर्व तरुण – तरुणी धबधब्याजवळ जात असताना स्थानिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु या समूहाने याकडे दुर्लक्ष करत पुन्हा धबधब्याकडे मार्गक्रमण केले. पर्यटनाचा आनंद घेताना सेल्फी घेण्यात दंग असलेल्या ओंकारचा पाय घसरून तो पाण्यात पडला.

पोहता येत नसल्यामुळे तो पाण्यात बुडाला. ग्रीन व्हॅली हॉटेल पासून दीड किमी अंतरावर खोल दरीत असलेल्या धबधब्यात हा प्रकार घडला आहे. या तरुणाचा मृतदेह अद्याप मिळालेला नसून उद्या सकाळी पुन्हा शोध मोहीम घेणार आहोत. घटनास्थळी चंदगड ग्रामीण पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.