जिल्हा पंचायत सभागृहात आज तिसऱ्या तिमाहीतील मासिक आढावा बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांसंदर्भात माहिती देण्यात आली. पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सर्व माहिती जाणून घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती तसेच लस वितरण व्यवस्था या संदर्भात त्यांनी आरोग्य खात्याला आवश्यक सूचना केल्या. सरकारच्या निर्देशानुसार कोविड -1 लसीकरण कार्यक्रमाचे अनुसरण करण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांची कमतरता भासू नये, तसेच खात वाटपाबाबत आलेल्या तक्रारींची काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली. यासोबतच नदीकाठच्या गावामध्ये पूरपरिस्थितीमुळे उद्भवलेल्या पायाभूत सुविधांच्या समस्येबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या असून पायाभूत सुविधांची झालेली गैरसोय लवकरात लवकर दूर करण्याची सूचना केली. तसेच पीक नुकसानीच्या प्रश्नाकडे सरकारने योग्य लक्ष पुरवून कार्यवाही करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील अनेक खराब रस्त्यांच्या तक्रारी वाढत चालल्या असून वाहतुकीला समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे बांधकाम विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांना रास्ता दुरुस्तीसाठी त्वरित पाऊले उचलावीत, असे त्यांनी सुचविले.
या विषयांसोबतच झोपडपट्टी विकास, शैक्षणिक विकास, कोविड लसीकरण आणि इतर महत्वाच्या विषयांवर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पालकमंत्री रमेश जारकीहोळी, आमदार अनिल बेनके, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, जिल्हा आरोग्य अधिकारी एस. व्ही. मुन्याळ, जिल्हा पंचायत अध्यक्ष आशा ऐहोळे, जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी आदींसह इतर अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.