Sunday, May 12, 2024

/

जिल्ह्यातील कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या दीडशेहेच्या आत

 belgaum

गेल्या 24 तासांत बेळगाव जिल्ह्यात नव्याने 9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 26,678 झाली आहे. जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या दीडशेहेच्या आत घटली असून ती आज 138 इतकी झाली आहे.

बेळगांव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने आज बुधवारी प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार आज बुधवार दि. 27 जानेवारी 2021 रोजी आजतागायत कोरोनासंदर्भात बेळगांव जिल्ह्यात एकूण 4,66,030 व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले. जिल्ह्यात 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 32,197 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 138 आहे.

काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 53,463 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 3,80,232 आहे. कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 4,64,939 जणांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत धाडण्यात आले होते. त्यापैकी 26,678 नमुन्यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून यामध्ये आज बुधवारी नव्याने आढळलेल्या 9 जणांच्या अहवालांचा समावेश आहे. प्रयोगशाळेत धाडलेल्या नमुन्यांपैकी 4,34,590 नमुने निगेटिव्ह असून जिल्ह्यात सक्रिय रुग्ण (ॲक्टिव्ह केसीस) 138 आहेत. त्याचप्रमाणे 1,097 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

 belgaum

जिल्ह्यात आतापर्यंत 342 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 26,198 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आज बुधवारी आढळलेल्या 9 कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये बेळगांव तालुक्यातील 5 तसेच गोकाक, खानापूर व बैलहोंगल तालुक्यातील प्रत्येकी एका व अन्य भागातील एका रुग्णाचा समावेश आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.