कर्नाटकचा प्रश्न केवळ एका राज्यापुरता मर्यादित नसून तो दोन राज्यातील सीमा प्रश्न आहे, हे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना कळले पाहिजे. त्यांनी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना उद्देशून म्हंटले आहे. तसेच आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आहेत हेसुद्धा कर्नाटकच्या सरकारने लक्षात ठेवावे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत कर्नाटक व्याप्त वादग्रस्त केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा, असे म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच कर्नाटक सरकारवर निशाणा साधला होता.
यालाच प्रत्युत्तर म्हणून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी कर्नाटकातील मराठी भाषिकांची मुंबई कर्नाटकात सामील करण्याची इच्छा आहे, असे म्हंटले होते याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे सांगितले तेंव्हा त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व अन्य नेते हजर होते. कर्नाटकचा प्रश्न हा केवळ कर्नाटकचा नसून हा दोन राज्यांमधील सीमाप्रश्न आहे हे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना कळाले पाहिजे. त्यांनी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे.
महाराष्ट्र राज्यात आमचे कानडी बांधव राहतात. आम्ही त्यांच्यावर कुठलीही सक्ती केलेली नाही. त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य दिलेले आहे. इथे कानडी शाळा आम्ही चालवतो. आम्ही कानडी शाळांना अनुदान देतो. महाराष्ट्रात अनेक कानडी संस्थादेखील चालविल्या जातात.
परंतु बेळगाव सारख्या भागात ही परिस्थिती आहे का? ही लढाई कशासाठी आहे? तर ही लढाई आपली भाषा आपली संस्कृती टिकवण्यासाठी आहे असे सांगून आम्ही काय देशाच्या बाहेर जा असे कधी कुणाला म्हणत नाही, असेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.
कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या वक्तव्याला शिवसेना खासदार संजय राऊत यांचे प्रत्त्युतर-काय म्हणाले राऊत पहा खालील व्हीडिओतhttps://m.facebook.com/story.php?story_fbid=1314050775619179&id=375504746140458