नंदिहळळी तून धारवाड रेल्वे मार्ग नको अशी मागणी परिसरातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. दरम्यान हुबळी येथे झालेल्या रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत संबंधित शेतकऱ्यांनी रेल्वेमार्गात बदल करून द्यावा अशी मागणी खासदार इराणणा कडाडी यांच्याकडे केली. त्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून या मार्गात बदल करून घ्यावा असे सुचविले आहे.त्यानंतर बैठकीत रेल्वे मार्गात बदल करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नुकतीच बैठक घेण्यात आली रेल सौध येथे झालेल्या बैठकीत दरम्यान खासदार इराना कडाडी यांनी रेल्वे विभागातील दक्षिण विभागाचे अभियंत्यांना याबाबत सूचना केल्या आहेत. त्यांनी या मार्गात बदल करू असे आश्वासन देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. याबाबतचे निवेदनही देण्यात आले आहे.
प्रसाद पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य मारुती लोकूर, मार्कंडेय साखर कारखान्याचे संचालक परशराम कोलकार यांच्यासह सह अनेक शेतकऱ्यांनी हुबळी येथे इराण्णा कडाडी यांची भेट घेतली. या रेल्वे मार्गात बदल केल्यास अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वाचणार आहेत.
सरकारचे अधिक रक्कम खर्च होणार नाही. आठ किलोमीटर मधून जाणार्या या रेल्वे मार्गात बदल केल्यास अनेकांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रेल्वेमार्गात बदल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हा रस्ता के के कोप मार्गे केल्यास सोयीचे ठरणार आहे. कारण त्या ठिकाणाहून खडकाळ जमीन असल्यामुळे तेथे पिकांचे नुकसान होणार नाही असेही यावेळी सांगण्यात आले. नव्याने सर्वेक्षण करून या मार्गाची आखणी करावी आणि रेल्वे प्रशासनाला पडणारा अतिरिक्त भार कमी कमी होईल असेही सांगण्यात आले आहे.
त्यानंतर खासदार इरांना कडाडी यांनी संबंधित अभियंत्यांची संपर्क साधून रेल्वे मार्गात बदल करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.