Thursday, January 23, 2025

/

मुतखडा व त्यावरील उपाय

 belgaum

मुतखड्याचा त्रास होऊ लागला की जीव अगदी बेजार होतो. याचं कारण मुतखड्याच्या त्रासामुळे पोटात अतिशय तीव्र वेदना जाणवतात. असं म्हणतात की, भारतात दर दहा माणसांपैकी एकाला मुतखड्याचा त्रास होतो. मूत्राशयामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकली जातात. ज्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. किडनी आपल्या शरीरात महत्त्वाची भूमिका पार पडत असते. ज्यामुळे तुमचे शरीर निरोगी  राहते. जेव्हा अयोग्य जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे मूत्राशयाच्या या कार्यांत अडथळा येतो. तेव्हा मूत्राशयातील विषद्रव्यांमुळे मूत्राशयात स्फटिकाप्रमाणे खडे तयार होतात. ज्यांना किडनी स्टोन अथवा मुतखडा अथवा मूत्रपिंड दगड असं म्हणतात. मुतखड्याचा आकार आणि प्रमाणानुसार याचा त्रास जाणवतो. या विकाराची लक्षणे पटकन न जाणवल्यामुळे अचानक त्याचे प्रमाण वाढल्यावर तीव्र पोटदुखी जाणवते. ज्यामुळे तुम्हाला किडनी स्टोन झाल्याचे निदान होते. खरंतर सर्वांना या समस्येबाबत माहीत असणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला किडनीस्टोनची लक्षणे, कारणे आणि उपचारपद्धती माहीत असायलाच हव्या. शिवाय किडनी स्टोन घरगुती उपचारांनी कसा बरा करता येईल हे ही माहीत असायला हवं.

 

मुतखड्याचा त्रास होण्यामागची कारणे (Causes Of Kidney Stones )
किडनी स्टोन अथवा मुतखड्याची समस्या कोणालाही होऊ शकते. मात्र मुतखड्याचा त्रास काही लोकांना होण्याची शक्यता दाट असते. यासाठी जाणून घेऊया मूत्रपिड दगड त्रास नेमका कोणाला होऊ शकतो.
फॅमिली हिस्ट्री (Family or Personal History)

जर तुमच्या घरातील सदस्यांना किडनी स्टोन झालेला असेल तर तुम्हालाही मुतखड्याचा त्रास होण्याची शक्यता दाट आहे. आई, वडील, भावंडे यांना हा त्रास यापूर्वी झाला असेल तर तुम्हाला याबाबत सावध राहाणं गरजेचं आहे. शिवाय जर तुम्हाला जर एकदा मुतखड्याचा त्रास झाला तर तो भविष्यात पुन्हा होण्याची शक्यता नक्कीच असू शकते.
डिहायड्रेशन (Dehydration)Kidney stones

जर तुम्ही नियमित मुबलक पाणी पित नसाल तर तुम्हाला किडनी स्टोन होण्याची शक्यता अधिक आहे. कारण माणासाच्या शरीरातील सर्व कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी तुम्हाला दिवसभरात कमीत कमी आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. मात्र कधी कधी काही लोकांना खूपच कमी पाणी पिण्याची सवय असते. थंड हवेच्या ठिकाणी राहणारे अथवा हिवाळ्यात माणसे कमी प्रमाणात पाणी पितात. असं केल्यास शरीर डिहायड्रेट होतं आणि मुतखड्याचा त्रास होऊ शकतो.
अयोग्य आहार (Improper Diet)तुमच्या आहाराचा तुमच्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम होत असतो. जर तुमचा आहार चुकीचा असेल तर तुम्हाला मुतखडा होण्याची शक्यता अधिक आहे. कारण जर तुम्ही आहारातून अती मीठ, अती प्रमाणात प्रोटिनयुक्त आहार, अती गोड पदार्थ खात असाल तर सावध राहा. कारण अती प्रमाणातून घेतलेलं मीठ आणि साखरेचा निचरा योग्य प्रमाणात होत नाही आणि मग हे टाकाऊ पदार्थ मूत्राशयात साचून राहतात आणि  तुम्हाला किडनी स्टोन होतो.
अती वजन (Overweight)

काही लोकांचं वजन त्यांच्या आदर्श वजनापेक्षा अधिक असतं. ज्यामुळे त्यांचा बॉडी मास इंडेक्स जास्त असतो. अशा लोकांना किडनी स्टोन होण्याची शक्यता अधिक असते. यासाठी जर तुमचं वजन जास्त असेल तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा.
काही आजार आणि सर्जरी (Digestive Diseases and Surgery)

जर तुम्हाला पोटाचे आजार असतील अथवा तुमच्या पोटाची सर्जरी झाली असेल तर तुम्हाला हा त्रास होऊ शकतो. याचं कारण असं की या आजारामुळे तुमच्या पचन संस्थेवर परिणाम होतो  आणि तुमच्या किडनीवर त्याचा ताण येऊ शकतो.
काही आरोग्य समस्या (Other Medical Conditions)

काही आरोग्य समस्यांचा थेट परिणाम तुमच्या मुत्राशयावर होतो. ज्यामुळे तुमच्या मूत्राशयाच्या कार्यात अडचणी येतात. ज्यामुळे मूत्राशयाचा निचरा व्यवस्थित होत नाही. ज्यामुळे तुम्हाला  भविष्यात किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढते.
मुतखड्याची लक्षणे (Kidney Stone Symptoms In Marathi)

मुतखड्यावर निदान करण्यासाठी त्याची प्रमुख लक्षणे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ज्यामुळे वेळीच निदान झाल्यामुळे मुतखड्याचा त्रास कमी करता येतो.
पाठदुखी आणि पोटदुखी जाणवते (Severe Pain In The Side, Back & Stomach)

किडनी स्टोन झाल्यामुळे पोटातून आणि पाठीतून ज्या वेदना जाणवतात त्या असह्य असतात. ज्या लोकांना याचा त्रास होतो ते सांगतात की या वेदना प्रसववेदनेप्रमाणे तीव्र असतात. अनेकांना तर अशा तीव्र वेदना जाणवल्यावरच त्यांना मुतखडा झाला आहे याचे निदान होते. या वेदना साधारणपणे ओटीपोटातून सुरू होतात. युरीन साफ न झाल्यामुळे या वेदना जाणवू लागतात. शिवाय या वेदनांमुळे तुम्हाला युरीनला प्रंचड त्रास होतो.
युरीन करताना जळजळ होते (Inflammation During Urine)

जर तुमचा मुतखडा अथवा मुतखडे मूत्राशयातून मूत्रमार्गातून बाहेर पडू लागले तर त्यामुळे युरीन करताना जळजळ होते. युरीन बाहेर पडताना यामुळे प्रचंड त्रास होतो.

यामुळे तुम्हाला युरीन इनफेक्शनदेखील होऊ शकते.
युरीन करताना रक्त पडणे (Blood In Urine)

मुतखडे अतिशय कठीण असतात. शिवाय हे खडे हळूहळू मूत्राशयातून मूत्रमार्गावाटे बाहेर पडू लागतात. मूत्रमार्गात हे खडे अडकल्यामुळे मूत्रावाटे रक्त पडण्याची शक्यता असते. ज्यामुळे काही वेळा युरीनला गेल्यावर रूग्णांच्या मूत्रमार्गातून रक्त येऊ लागते. मूत्रमार्गात जखम झाल्यामुळे लघवी करणं कठीण जातं.
फेसाळ आणि दुर्गंधीयुक्त लघवी होणे (Smell In Urine)
तुमचे आरोग्य चांगले आहे हे तुम्हाला शौचावाटे अथवा मूत्रावाटे समजू शकते. मुतखडा झाल्यामुळे तुमच्या मूत्रमार्गात अडथळे येतात. ज्याचा परिणाम तुम्हाला युरीनला व्यवस्थित होत नाही. मूत्रावाटे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. मात्र या कार्याला अडथळा आल्यामुळे मूत्र शरीरात साठून राहते. टाकाऊ पदार्थांचा निचरा न झाल्यामुळे तुमच्या युरीनला दुर्गंध येतो शिवाय फेसाळ युरीन होते.
सतत युरीनला झाल्याची भावना होणे (Persistent Need To Urinate)
9964946918
9916106896
Dr Sarnobat

बऱ्याचदा मुतखडे छोटे आणि मोठे असे दोन्ही आकाराचे असतात. मुतखड्यांचा आकार लहान असेल तर ते लघवीवाटे बाहेर पडतात. मात्र जर त्याचा आकार प्रमाणापेक्षा मोठा असेल तर त्यामुळे तुमचा मूत्रमार्ग बंद होतो. युरीनला व्यवस्थित न झाल्यामुळे तुम्हाला वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होते. शिवाय युरीन न झाल्यामुळे अस्वस्थ वाटते.
मळमळ आणि उलटी होणे (Nausea and Vomiting)

मुतखड्याचे हे एक प्रमुख लक्षण आहे. शरीरात निसर्गतः स्वच्छता राखण्याची योजना केलेली असते. शौच आणि मूत्रावाटे शरीरातील विषद्रव्ये आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात. मात्र यात अडथळा आल्यामुळे तुम्हाला मळमळ आणि उलटी झाल्यासारखे वाटते. मूत्रमार्ग बंद झाल्यामुळे शरीरातील घाण बाहेर टाकण्यासाठी शरीरामध्ये अशी लक्षणे जाणवतात.
अंगात ताप येणे अथवा थंडी वाजणे (Fever and Chills)

तुम्हाला मुतखड्याचा त्रास होत असेल तर थंडी भरून ताप येऊ शकतो. किडनी स्टोन ही एक भयंकर मोठी आरोग्य समस्या आहे ज्यामुळे तुमच्या इतर शारीरिरक कार्यात अडथळे येतात. ज्याचा परिणाम तुमच्या शरीरातून अशा प्रकारे दर्शवला जातो. जर तुम्हाला या समस्येमुळे ताप आला तर त्वरीत डॉक्टरांचा
सल्ला घ्या.
होमिओपॅथी
समुळ किडनी स्टोन नष्ट होतात किंवा विरघळून जातात.
9916106896
9964946918
डॅा सोनाली सरनोबत

मुतखड्याचा त्रास त्यावरील उपाय काय नक्की पहा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

https://www.facebook.com/375504746140458/posts/1306517823039141/

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.