कर्ज फेडता येत नसल्याने एकाच कुटुंबातील चौघा जणांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रायबाग तालुक्यातील भिराड (भिरडी) येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
रेल्वेखाली आत्महत्या करणाऱ्यांची नावे सातप्पा सुतार (वय 60), महादेवी सुतार (वय 50), संतोष सुतार (वय 26) आणि दत्तात्रय सुतार (वय 28) अशी आहेत.
वडिलांनी काढलेले कर्ज फेडता येत नसल्यामुळे नैराश्येच्या भरात संपूर्ण सुतार कुटुंबाने बुधवारी रात्री भिरडी नजीक निजामुद्दीन एक्सप्रेस रेल्वे खाली स्वतःला रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केली.
सदर आत्महत्येचा प्रकार आज गुरुवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सदर घटनेची रेल्वे पोलीस स्थानकात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे