Sunday, December 22, 2024

/

आता करा बेळगाव ते चेन्नई थेट नॉनस्टॉप विमान प्रवास!

 belgaum

चेन्नई ला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता त्यांच्यासाठी येत्या 2 फेब्रुवारीपासून बेळगावहून थेट चेन्नई येथे नॉनस्टॉप विमानसेवा सुरू होणार आहे.

कमी खर्चाच्या इंडिगो विमान कंपनीची एटीआर 72 -600 विमानसेवा येत्या 2 फेब्रुवारी 2021 पासून बेळगाव ते चेन्नई मार्गावर कार्यान्वित होणार आहे.

बेळगाव येथून हे विमान (6 ई 7132) सकाळी 10:55 वाजता उड्डाण करेल आणि दुपारी 01:15 वाजता चेन्नईला पोहोचेल.

त्याप्रमाणे चेन्नई येथून सकाळी 08:10 वाजता उड्डाण करणारे विमान (6 ई 7131) बेळगावला सकाळी 10:25 वाजता पोहोचेल. या विमान सेवेमुळे चेन्नई हे बेळगावला हवाई मार्गे जोडले जाणारे देशातील 12 वे शहर असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.