छावणी परिषदेच्या व्याप्तीतील (कॅंटोन्मेंट बोर्ड) रहिवाशांच्या हितासाठी ई-छावणी पोर्टल सेवा सुरु करण्यात आली आहे. कॅंटोन्मेंट बोर्डाचे अधिकारी बर्चस्व यांनी हि सेवा सुरु केली असून बेळगाव कॅंटोन्मेंट परिसरातील रहिवाशांच्या हितासाठी हि सेवा सुरु करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
बेळगाव कॅंटोन्मेंट बोर्डचा कर भरणे, सबमिशन, परवाना, भाडेपट्टीच्या नूतनीकरणासाठी अर्ज, व्यवसाय नोंदणी आदी सेवा या पोर्टल सेवेद्वारे देण्यात येणार आहेत.
या पोर्टलचे अनावरण कॅंटोन्मेंट बोर्डाचे कार्यकारी अधिकारी बर्चस्व यांनी मंडळाचे सदस्य आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केले आहे. या सेवेच्या अनावरणानंतर एका माहितीपत्रकाद्वारे जनतेपर्यंत त्यांनी हि माहिती पोहोचवली आहे. हे पोर्टल परिसरातील नागरिकांना उत्तम आणि त्वरित सेवा देण्यासाठी उपयुक्त ठरेल.
या व्यतिरिक्त कोणतीही समस्यां असल्यास प्रशासनाच्या कार्यालयात संपर्क साधून समस्या सोडवून घेता येईल. प्रशासन आधुनिकतेनुसार बदलत असून नागरिकांनी या नव्या प्रणालीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बर्चस्व यांनी केले आहे.
यावेळी कॅंटोन्मेंट बोर्डाचे सदस्य रिझवान बेपारी, विक्रम पुरोहित, साजिद शेख, अल्लाउद्दीन किल्लेदार, निरंजना अष्टेकर, अरेबिया धारवाडकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.