बेळगाव जिल्ह्यातील 14 तालुक्यातील सर्व ग्राम पंचायतीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आरक्षणाचे वेळापत्रक जाहीर जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी जाहीर केले आहे.
जिल्ह्यातील 14 तालुक्याच्या सर्व तहसीलदार यांनी तालुका केंद्रात आरक्षण जाहीर करण्या करिता स्थळ आणि बाकीची व्यवस्था करून घ्या अश्या सूचना देखील जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.
कोविड नियमांचे पालन करूनच अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचे आरक्षण कार्यक्रम घ्या असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.सर्व तहसीलदार यांनी ठिकाणी निश्चित करून त्या ठिकाणी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात अशीही सूचना दिली आहे.
कोणत्या तालुक्याचे आरक्षण कधी जाहीर होणार वाचा खालील विवरण
बेळगाव तालुका- 21 जानेवारी सकाळी 10 ते दुपारी 1
खानापूर तालुका-21 जानेवारी दुपारी 3 ते सायंकाळी 5:30
हुक्केरी तालुका-19 जानेवारी सकाळी 10 ते दुपारी 1
गोकाक-22 जाने सकाळी 10 ते दु.1
निपाणी- 23 जाने. दु.3 ते सायंकाळी5:30
अथणी 16 जाने. सकाळी 10 ते 1
कागवाड दुपारी 3 ते 5:30