बेळगाव लवकरच हवाई मार्गे निळे शहर जोधपुरशी जोडले जाणार आहे. स्टार एअर कंपनी बेळगाव आणि जोधपुर दरम्यान विमानसेवा सुरू करणार असून ही विमानसेवा पुढे अहमदाबादला जोडली जाणार आहे.
परतीच्या प्रवासात ही विमानसेवा अहमदाबाद ते जोधपुर आणि त्यानंतर बेळगाव अशी असणार आहे. उडान प्रादेशिक संपर्क अंतर्गत ही विमानसेवा सुरू होणार आहे. याच पद्धतीचा प्रस्ताव कंपनीने डीजीसीए समोर ठेवला आहे.
बेळगाव ते जोधपूर विमानसेवा या महिन्यातच सुरू होण्याची शक्यता आहे. जोधपूर विमानतळाचे संचालक जी. के. खरे यांनी दिलेल्या माहितीनुसार स्टार एअर कंपनी जोधपूर ते बेळगाव विमान सेवा सुरू करण्याच्या विचारात आहे. कंपनीच्या मुख्यालयाकडून या प्रस्तावास मंजुरी मिळताच ही विमानसेवा सुरू केली जाणार आहे.
स्टार एअर कंपनी सध्या किशनघर आणि सुरत सेक्टरमध्ये आपली विमानसेवा देत आहे. आता लवकरच जोधपूर ते जामनगर आणि जोधपुर ते बेळगाव विमान सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी 50 आसनी एम्बरेर विमान वापरले जाणार आहे. त्यामुळे एकावेळी 50 प्रवासी सदर शहरांना भेटी देऊ शकणार आहेत.