Sunday, October 6, 2024

/

रॉयल नाईटला नमवून बालाजी फायटर्स अजिंक्य!

 belgaum

राजस्थानी युथ क्लब व बीसिटी इलेव्हन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संगीता चिंडक स्मृती मारवाडी समाज मर्यादित टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद बालाजी फायटर्स या संघाने पटकाविले आहे.

कॅम्प येथील युनियन जिमखाना मैदानावर तीन दिवस आयोजित सदर स्पर्धेत 8 संघांनी भाग घेतला होता. स्पर्धेच्या मंगळवारी झालेल्या अंतिम सामन्यात बालाजी फायटर्स संघाने प्रतिस्पर्धी रॉयल नाईट संघाचा 8 धावांनी पराभव करून विजेतेपद हस्तगत केले. अंतिम सामन्यात बालाजी फायटर्सने 10 षटकात 4 बाद 113 धावा केल्या. त्यांच्या अक्षय जैनने 2 षटकार व 6 चौकारांसह 28 चेंडूत 50 धावा झळकवल्या. त्याला योग्य साथ देताना रोहित पोरवाल (41 धावा) आणि धीरज वैष्णव (11 धावा) यांनी उत्तम फलंदाजी केली. प्रत्युत्तरादाखल रॉयल नाईट संघाला 10 षटकात 4 गडी बाद 105 धावा काढता आल्या.

बालाजी संघातर्फे अक्षित जैन, रजत पोरवाल, विक्रम सिंग व धीरज वैष्णव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.Cricket

अंतिम सामन्यानंतर आयोजित बक्षीस वितरण समारंभात ज्योती चिंडक, निखिल चिंडक, मदनकुमार भैरवप्पणावर, राहुल जारकीहोळी, विक्रम राजपुरोहित, मनोहर दायम व रमेश पाटील यांच्या हस्ते विजेत्या बालाजी फायटर्स आणि उपविजेत्या रॉयल नाईट संघाला रोख रक्कम ट्रॉफी आणि पदके देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्कार बाळू जोशी यांच्या मालकीच्या बालाजी फायटर्स संघातील अक्षय जैन याला तर स्पर्धेतील मालिकावीर पुरस्कार अष्टपैलू रोहित पोरवाल याला प्रदान करण्यात आला.

रोहितने स्पर्धेत अवघ्या 34 चेंडूत 107 धावांसह शतक झळकावले हे विशेष होय. रोहितसह केतन पोरवाल व अनिश बंग यांनी स्पर्धेत षटकार ठोकले. त्याप्रमाणे बाळू जोशी आणि गोपाळ भट्टद यांनी सलग तीन गडी बाद करून हॅटट्रिक नोंदविली. त्यांचा धीरज वैष्णव याने उत्कृष्ट गोलंदाजी केली. या यशाबद्दल बालाजी फायटर्स संघाचे मारवाडी समाजात अभिनंदन होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.