Thursday, May 2, 2024

/

सामाजिक कार्यकर्त्यांनी जखमी वासराला मिळवून दिला आसरा

 belgaum

अज्ञात वाहनाच्या ठोकरीने गंभीर जखमी झालेल्या एका गायीच्या वासरावर सामाजिक कार्यकर्त्यांनी उपचार करून त्याला गोशाळेत आसरा मिळवून दिल्याची घटना नुकतीच घडली.

पांगुळ गल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते रोहित रावळ, पप्पू मुतकेकर व कृष्णा यांना सोमवारी दुपारी गंभीर जखमी अवस्थेतील एक वासरू रस्त्यावर फिरताना आढळले. रविवारी रात्री अज्ञात वाहनाने ठोकल्यामुळे त्या वासराला दुखापत झाली होती.Rohit raval

असहाय्य अवस्थेतील या वासराला काल सोमवारी दुपारी रोहित रावळ, पप्पू मुतकेकर व कृष्णा यांनी सन्मान हॉटेल समोरील जनावरांच्या दवाखान्यात घेऊन त्याच्यावर उपचार केले.

 belgaum

तसेच चांगली देखभाल व्हावी आणि आसरा मिळावा यासाठी त्या मोकाट वासराला हालगा येथील जैन गोशाळेमध्ये नेऊन दाखल केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.