Thursday, January 9, 2025

/

मासिक आवर्तविकार ‘प्रीमेन्स्ट्युअल टेन्शन सिंड्रोम’-वाचा सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

मासिक आवर्तविकार ‘प्रीमेन्स्ट्युअल टेन्शन सिंड्रोम’
स्त्रियांमध्ये ‘एस्ट्रोजेन’ व ‘प्रोजेस्टेरॉन’ ही दोन महत्वाची हार्मोन्स असतात. बिजांडकोषातून, यकृतातून या हार्मोन्सची निर्मिती होते. वयाच्या बाराव्या वर्षापासून मुलीच्या रक्तामध्ये एस्ट्रोजेन हे हार्मोन मोठ्या प्रमाणात मिसळू लागते. त्यामुळे त्यांची झपाट्याने वाढ होते.

मुलगी वयात आल्याची लक्षणे जाणवू लागतात. साधारणतः प्रत्येक 28 ते 30 दिवसानंतर तिच्या शरीरातून ऋतुस्राव थांबणे किंवा प्रमाण वाढणे इत्यादी अनेक तक्रारी स्त्रियांमध्ये आढळून येतात. यापैकी ‘प्रिमेन्स्टयुअल सिंड्रोम’ हा एक वैशिष्टयपूर्ण विकार आहे. सव्वीस सत्तावीस वर्षाच्या गौरीला असाच काहीसा त्रास व्हायचा.

एरवी शांत समंजस असणारी गौरी अचानकच उग्ररूप धारण करायची. नवर्‍यावर, मुलांवर उगाचच चिडायच, ओरडायचं नंतर आपणच रडायच, अगदी निराश व्हायची. आदळआपट करायची. शांत, नग्र असणारी गौरी एकदम दुर्गा बनायची. तिचं तिलाच समजायचं नाही, आपणाला काय होतय ते! नंतर हळुहळू तिच्या लक्षात आलं की, हा त्रास आपल्याला फक्त मासिक पाळी जवळ आल्यावरच होतोय आणि एकदा का ऋतुस्रावाला सुरूवात झाली की, परत सगळं नॉर्मल. पुन्हा दुर्गेची गौरी. या विकारालाच ‘प्री- मेन्स्ट्रयुअल सिंड्रोम’ अर्थात ‘पीएमएस’ म्हणतात. अर्थात होमिओपॅथिक उपचारांनी गौरी पूर्ण बरी झालीदेखील!

कारणे व लक्षणे- ऋतुस्राव होण्यापूर्वी थोडे दिवस काही स्त्रियांमध्ये निराशेची भावना येते. तर काहीजणी खूप चिडतात, पटकन रागावतात, डोकेदुखी, स्तन जड होणे, झोप न येणे, ओटीपोट घट्ट होणे, उलट्या किंवा जुलाब होणे अशी लक्षणेही दिसून येतात. शरीरातील हार्मोन्सच्या असमतोलामुळे स्त्रियांमध्ये असे शारीरिक व मानसिक बदल घउतात. ऋतुस्राव सुरू झाला की एका दिवसात ही सर्व लक्षणे कमी होतात. काही स्त्रियांना या काळात अर्धशिशी (मायग्रेन) चा त्रास होतो. काही स्त्रियांचे सांधे दुखतात. काहींना मानसिक दडपण येते, विविध त्रास होतात

.Pms

उपचार
होमिओपॅथी- होमिओपॅथीमध्ये सर्वांगसुंदर उपचार साध्य होतात. याला मुख्य कारण असे आहे की होमिओपॅथीमध्ये शरीराबरोबरच मनाचा आणि बुध्दीचासुध्दा तेवढाच विचार केला जातो. त्यामुळे शारीरिक लक्षणांबरोबर मानसिक व्यथासुध्दा कमी करता येतात. पी. एम. एस मध्ये पुढील काही औषधे यशस्वीरीत्या वापरता येतात.

सिमिसीफ्युगा- मानसिक उदासीनता, चंचलता, उगाचच काहीतरी भास होणे, ऋतुस्रावाच्या वेळेस खूप दुखते, पोटातून कळा कमरेकडे, पायामधून जाणवत राहतात, कळ जास्त झाली की स्रावही जास्त होतो.
लॅकेसिस- संशयखारे वृत्ती, भांडकुदळ स्वभाव, वायफळ बडबड, सतत काहीतरी बोलणे, असंबध्द बोलणे, कोणतीही गोष्ट सहन होत नाही. परंतु ऋतुस्राव सुरू झाला की, ताबडतोब मानसिक स्थिती पूर्ववत चांगली होते.
www.drsonalisarnobat.com
झिंकममेट- सतत पाय हलवत राहणे, स्थिरता नसणे, ओटीपोटात खूप दुखणे परंतु लॅकेसीसप्रमाणेच ऋतुस्राव अँब्राग्रेसिया, बोव्हिस्टा (पाळीच्या आधी उलटया व जुलाब होणे), ट्रलीयम, सेपिया, प्लॉटिना, व्हिबर्मम, ग्राफाईट्स, क्रियोसोट, युस्टीलॅगो, झँथोझायलम अशी अनेक औषधं विविध लक्षण असलेल्या पीएमएस या विकारावर वापरता येतात.
निसर्गोपचार- 1. आवळ्याचा रस एक चमचा + केळफुलाचा रस एक चमचा हे मिश्रण सतत दोन महिने रात्री झोपताना घ्यावे.
2. खारकेचे चूर्ण एक चमचा, एक चमचा साजूक तुपाबरोबर रोज सकाळ संध्याकाळ असे तीन चार महिने घ्यावे.
3. कोरफडीचा रस एक चमचा व चिमुटभर सैंधव यांचे मिश्रण सकाळी उठल्या उठल्या घ्यावे.
4. अशोकवृक्षाच्या सालीचा काढा करावा. 90 ग्रॅम साल, पावकप दूध, दोन कप पाणी मिसळून उकळवून काढा करावा. दिवसातून दोन तीनदा घ्यावा. रोजच्या रोज ताजा काढा करावा
9916106896
9964946918

https://www.facebook.com/livebelgaum/videos/696847831017665/

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.