Monday, December 23, 2024

/

रामतीर्थ नगर विकासकामासाठी २९.३० कोटींचा अनुदान : आमदार बेनके

 belgaum

रामतीर्थ नगर च्या विकासासाठी बुडाच्या माध्यमातून २९.३० कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले असून बेळगाव उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांच्या प्रयत्नातून हे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

यासंदर्भात बोलताना आमदार अनिल बेनके म्हणाले कि, माझ्या मतदार संघातील अनेक विभागांना विकसित क्षेत्र बनविण्यासाठी मी प्रयत्न करत असून रामतीर्थ नगर सहित अनेक विभागात पुष्कळ विकासकामे राबविण्यात येत आहेत. रामतीर्थ नगरमधील विकासकामांमध्ये आरसीसी ड्रेनेज, आरसीसी नाला निर्माण कामगिरी, रस्ते विकास, रुंदीकरण, डेकोरेटिव्ह पथदीप, उद्यानांचा विकास असा विविध विकासकामांचा समावेश आहे. या सर्व विकासकामासाठी बुडाकडून २९.३० कोटींचे विशेष अनुदान मंजूर करून घेण्यात आले आहे. लवकरात लवकर या विकासकामांना प्रारंभ करण्यात येईल, आणि बेळगाव उत्तर मतदार क्षेत्राचा विकास अशाचपद्धतीने करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.