Wednesday, May 22, 2024

/

‘मराठी मतांसाठीचं दोन दिवसीय बैठक बेळगावात’

 belgaum

लोकसभा पोट निवडणूक तोंडावर असल्याने व अलीकडे राज्य सरकारने मराठा समाजासाठी मराठा विकास प्राधिकरनाची स्थापना केल्याच्या पाश्वभूमीवर बेळगाव येथे सलग दोन दिवस राज्य भाजपच्या कार्यकरणीची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

राज्यात भाजप सरकार अस्तित्वात आल्यानंतर प्रथमच बी एस येडीयुरप्पा सरकारने मराठा विकास प्राधिकरणची स्थापना करून 50 कोटींच्या निधीची तरतूद करून समाजाच्या विकासासाठी नवे पाऊल टाकले आहे.राज्यभरातून मराठा विकास प्राधिकारणाला कन्नड संघटनांनी विरोध दर्शवला असला तरी त्याकडे कानाडोळा करून त्याविषयीची अधिसूचना देखील काढली आहे.

राज्यात प्रामुख्याने सीमावर्ती भागांत मराठा समाजाची संख्या लक्षणिय आहे बेळगावच्या लोकसभा पोट निवडणुकी बरोबरच बिदर जिल्ह्यातील बसव कल्याण व मसकी विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुका देखील होताहेत. बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव लोकसभा मतदार संघात सुमारे 2 लाखांहून अधिक मतदार आहेत तर बसव कल्याण विधान सभा मतदारसंघात मराठी भाषिकांची अधिक आहे केवळ हेच डोळ्या समोर ठेऊन राज्य भाजप सरकारने बेळगावात भाजप राज्य कार्यकारणीचे आयोजन केले आहे.

 belgaum

बेळगाव शहर हे उत्तर कर्नाटकातील महत्वाचे केंद्र मानले जाते महाराष्ट्र व गोवा यांच्या सीमेवरील हे अत्यंत महत्वाचे शहर आहे.देशातील एकूण राजकीय परिस्थिती पाहता भाजपला या बेळगाव पोट निवडणुकीला अनेक संकटांना तोंड देण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळेच मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा सरकारने या भागातील मराठी भाषिकांना गोंजारायचा प्रयत्न चालवला आहे.

या दोन दिवसीय बैठक पोट निवडणुकीचा उमेदवार निश्चित करणे व मंत्रिमंडळ विस्तारा बाबत देखील चर्चा होऊ शकते.मुख्यमंत्री येडीयुरप्पा समोर मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचे व कुणाला वगळायचे याबाबत मोठा पेच आहे. केवळ सात खाती शिल्लक असताना उमेश कत्ती सह अनेक जणांनी मंत्री पदासाठी जोरदारपणे लॉबिंग चाकवली आहे.

खानापूरच्या अंजली निंबाळकर यांनी राज्य सरकार वर टीका करून आम्हाला भीक नको सुखाने जगू ध्या असे सांगत लिंगायत महामंडळाला 500 कोटी तर मराठा प्राधिकरनास 50 कोटी का? असा सवाल केला आहे. बेळगावातली राज्य भाजप कार्यकारणी लोकसभा पोट निवडणुकीच्या तोंडावर घेऊन मराठा प्राधिकरनाचे श्रेय उपटण्याचा प्रयत्न लोकांना दिसत आहे.

-प्रशांत बर्डे जेष्ठ पत्रकार बेळगाव

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.