कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित असलेले पोलीस अधिकारी एडीजीपी अलोक कुमार आज बेळगावमध्ये सायकल वर स्वार होऊन शहरात फेरफटका मारताना दिसून आले. औचित्य होते ते केएसआरपी उत्सवाचे!
आज बेळगावमध्ये होणाऱ्या केएसआरपी उत्सवाच्या निमित्ताने बेळगावमधील प्रमुख ठिकाणी या सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल फेरीत एडीजीपी अलोक कुमार यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी सहभागी झाले होते.
सुवर्णसौधपासून आज सकाळी सकाळीच सुरु झालेल्या या सायकलफेरीत बेळगाव पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी, कोब्रा, आयटीबीटी ट्रेनिंग सेंटरचे अधिकारी, तसेच बेळगावमधील विविध संघ संस्था या सायकल फेरीत सहभागी झाल्या होत्या. ही सायकल फेरी सुवर्ण विधानसौधपासून सुरु होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली होती.
यावेळी अलोक कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले कि, सध्या प्रत्येकाच्या आरोग्यावर अपायकारक परिणाम होत असून प्रत्येकाने सुदृढ आरोग्यासाठी नियमितपणे सायकल चालवावी.
दररोज चार ते पाच किलोमीटर सायकल चालविल्याने आपले आरोग्य उत्तम राहते. याशिवाय सायकलमुळे प्रदूषणही रोखण्यास मदत होते.