Wednesday, May 1, 2024

/

रेल्वे रुळावर आढळला अनोळखी मृतदेह

 belgaum

शहरातील रेल्वे ओव्हर ब्रिज जवळील रेल्वे रुळावर एका अज्ञाताचा मृतदेह आढळला आहे. साधारण ४५ वयोवर्षातील हा मृतदेह असून यासंबंधी कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

शहरातील भरतेश शाळेच्या जवळ रेल्वे ओव्हर ब्रिज जवळ हा मृतदेह आढळला असून मृत व्यक्तीसंबंधी माहिती मिळविण्याचा पोलीस प्रयत्न करत होते.

या मृतदेहाजवळ एक मोबाईल संच सापडला असल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आली असून मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

 belgaum

घटनास्थळी रेल्वे पोलिसांनी भेट देऊन घटनेचा तपशील घेतला. या व्यक्तीने आत्महत्या केली आहे? हा अपघात आहे? कि घातपात आहे? याविषयीचा पुढील तपास पोलीस घेत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.