Sunday, May 5, 2024

/

हस्तिदंत विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या जोडगोळीला अटक

 belgaum

हस्तिदंताची विक्री करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोघांना अटक करण्यात अरण्य विभागाला यश आले आहे. हुक्केरी तालुक्यातील गुटगुद्दी येथील लगमाप्पा नाईक (वय २९ वर्षे) आणि मार्कंडेय नगर येथील मल्लप्पा दोळप्पगोळ (वय २८ वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून अरण्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी हि कारवाई केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ७ हस्तिदंत जप्त करण्यात आले असून एका पोत्यातून हे हस्तिदंत तालुक्यातील होसवंटमुरी गावात विक्रीसाठी घेऊन जाण्यात येत होते.

यासंबंधी अरण्य विभागाला माहिती मिळताच अरण्य विभागाच्या पीएसआय रोहिणी पाटील आणि सहकाऱ्यांनी तातडीने संबंधित ठिकाणी धाव घेऊन दोन आरोपींना अटक केली आहे.

 belgaum

या आरोपींना चतुर्थ जेएमएफसी न्यायालयात हजर करण्यात आले असून हे हस्तिदंत कुठून आणण्यात आले आहेत यासंबंधी अरण्य विभागाच्यावतीने पुढील तपास आणि चौकशी करण्यात येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.