हे छायाचित्र आहे शहरातील जुन्या पी. बी. रोडवरील वनखात्याच्या कार्यालयासमोरचे. फक्त जुना पी. बी. रोडच नाहीतर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या बहुतांश रस्त्यांच्या विकास कामांच्या ठिकाणी सध्या या पद्धतीचे वाहतूक कोंडीचे चित्र पहावयास मिळत आहे.
यापैकी बहुतेक ठिकाणी एकेरी वाहतूक करण्यात आली असल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
यापूर्वी पावसाळ्यात वाहतूक कोंडी बरोबरच संबंधित रस्त्यांवरील चिखल व दगडधोंड्यांमुळे तर आता धुळीच्या साम्राज्यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत हाती घेण्यात आलेली शहरातील रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करून वाहतूक कोंडीच्या समस्येतून नागरिकांची सुटका करावी अशी जोरदार मागणी केली जात आहे.