Thursday, May 2, 2024

/

मद्यपीच्या मारहाणीत मध्यस्थी करणारा शिक्षक जखमी

 belgaum

शाळेत घुसुन शिक्षिकांशी असभ्य वर्तन करणार्‍या मद्यपिणे समजण्यास आलेल्या शिक्षकावर हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना मुगळी (ता. चिकोडी) येथे नुकतीच घडली.

जखमी शिक्षकाचे नांव महादेव बजंत्री असे आहे. मुगळी (ता. चिकोडी) येथील शाळेतील शिक्षिका मुख्याध्यापक कक्षात बसलेल्या असताना मद्यधुंद राजू पाटील नामक व्यक्तीने तेथे येऊन शिक्षिकांना अर्वाच्च शिवीगाळ करून असभ्य वर्तन केले.

त्यावेळी महादेव महादेव बजंत्री हे शिक्षक मध्यस्थी करण्याच्या हेतूने त्याला समजावण्याचा गेले. त्यावेळी बेभान झालेल्या राजू पाटील याने त्यांच्यावरच हल्ला करून मारहाण केली.

 belgaum

यामध्ये बजांत्री यांच्या डोळ्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी संबंधित शिक्षकांना पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची सूचना देण्यात आली असल्याचे कळते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.