तालुका पंचायत सर्वसाधारण बैठकीत पीडीओ यांच्याविरोधात जोरदार पवित्रा घेण्यात आला. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या कोणत्याही कामाला तालुका पंचायत सदस्यांना बोलविण्यात येत नाही. त्यामुळे आमचा अवमान करण्यात येत आहे. याचबरोबर अनेक मनमानी कामे करून बेकायदेशीररित्या परवानग्या घेऊन बक्कळ पैसा कमावणाऱ्या पिडिओवर कारवाई करण्याची मागणी तालुका पंचायतीच्या बैठकीत करण्यात आली.
यावेळी तालुका पंचायत अध्यक्ष शंकरगौडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी व्यासपीठावर तालुका पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी उपाध्यक्ष मारुती सनदी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पीडीओने तालुका पंचायत सदस्य अवमान करण्यास सुरुवात केली आहे.
मात्र याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. मागील दोन वर्षांपासून चालू ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात तालुका पंचायत सदस्यांसाठी एक वेगळी खुर्ची ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या कारभारामुळे अनेकातून बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. याचबरोबर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जी प्लस टू बांधकाम इमारतीसाठी परवानगी देण्यात येते. मात्र प्रत्येक ठिकाणी आता चार-पाच मजली इमारती बांधण्यात येत आहेत.
बुडा कार्यक्षेत्रात असे प्रकार सुरू असून याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. इमारती बनविण्यासाठी पैसे खाऊन अनेक ग्रामविकास अधिकाऱ्यांना बक्कळ माया जमवली आहे. त्याच्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.