Sunday, May 5, 2024

/

प्रवाशांसाठी आता बेळगांव विमानतळावर वैद्यकीय तपासणी कक्ष

 belgaum

बेळगांव विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमालीची वाढल्यामुळे या प्रवाशांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे तितकेच गरजेचे झाले आहे. यासाठी विमानतळ व्यवस्थापनाकडून जुन्या टर्मिनल बिल्डिंगमध्ये वैद्यकीय तपासणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. आरोग्याची समस्या उद्भवल्यास प्रवाशांना तातडीची सेवा देण्यासाठी हा कक्ष महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

बेळगांव (सांबरा) विमानतळावरून देशातील महत्त्वाच्या शहरांना हवाई प्रवास सेवा देण्यात येत असल्यामुळे प्रवाशांच्या संख्येत अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लॉक डाऊननंतर तब्बल 1 लाख प्रवाशांनी या विमानतळावरून विमान प्रवास केला आहे. सध्या दररोज 1,200 च्या आसपास प्रवासी या विमानतळावरून प्रवास करीत असून यासाठी 25 ते 26 विमानांची ये -जा सुरू असते.

कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या वाढत्या संख्येनुसार त्यांच्या आरोग्य सुरक्षेची योग्य ती काळजी घेणे तितकेच गरजेचे बनले आहे. आरोग्याची समस्या उद्भवल्यास प्रवाशांवर किमान प्राथमिक उपचार व्हावेत यासाठी आता विमानतळावर वैद्यकीय तपासणी कक्ष सुरू करण्यात आला आहे.

 belgaum

विमानतळाच्या जुन्या टर्मिनल इमारतीमध्ये असलेल्या या कक्षामध्ये रुग्ण प्रवाशावर प्राथमिक उपचार करता येतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. परिणामी प्रवाशांच्या दृष्टीने हा कक्ष महत्त्वाचा ठरणार असून येथील सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध असणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.