कोरोनाच्या पाश्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यासह कर्नाटक महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौन्दत्ती येथील रेणुकादेवी यात्रा काळात रेणुका यल्लमा देवस्थान आणि जोगणभावी येथे प्रवेश बंदी करण्यात आली आहे.बेळगाव जिल्हा प्रशासनाने 31 डिसेंबर पर्यंत ही प्रवेशबंदी घालण्यात आली आहे असा आदेश जिल्हाधिकारी डॉ एम जी हिरेमठ यांनी दिलो आहे.
या वर्षी मार्च 22 तारखेपासून बेळगाव जिल्ह्यातील सौन्दत्ती मधील रेणुकादेवी मंदिर दर्शनास बंद करण्यात आलीत आहेत.दरवर्षी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात वार्षिक यात्रा होत असते या यात्रेत बेळगाव सह उत्तर कर्नाटक गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रातोल लाखो लोक दर्शनसाठी येत असतात .
भाविकांनी जनतेचे आरोग्य लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने सामान्य जनतेला मंदिर प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
30 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत ही बंदी घालण्यात आली असून दररोजच्या धार्मिक विधी मन्दिर प्रशासन करणार आहे असे जिल्हाधिकारी यांनी बजावलेल्या आदेशात म्हटलं आहे.