माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीप्रित्यर्थ गोकाक मध्ये कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. इंदिरा गांधी यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या प्रियांका आणि राहुल या मुलांनी त्यांच्या गोकाक येथील गार्डन मधील गृह कचेरीत श्राद्धांजली वाहिली.
गुरुवारी झालेल्या या कार्यक्रमात सतीश जारकीहोळी यांचे सुपुत्र राहुल जारकीहोळी आणि कन्या प्रियांका जारकीहोळी यांनी इंदिरा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.
यावेळी नगर घटक चे माजी काँग्रेस अध्यक्ष विवेक जत्ती म्हणाले कि, इंदिरा गांधींनी भारतासाठी मोठे योगदान दिले आहे. त्या एक अद्वितीय अशा महिला भारताला लाभल्या होत्या. त्यांचे स्मरण करण्यासाठी जारकीहोळी कुटुंब आणि काँग्रेसच्यावतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला बसवराज जत्ती, अरविंद कारची, मारुती गुटगुद्दी, पांडुरंग रंगसुभे, मुन्ना खतीब, नाडिगेर, सुरेश आदींसह इतर मान्यवर आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.