मराठा समाजाच्या विकासासाठी कर्नाटक सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर ५० कोटींची तरतूद केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मराठा समाज विकास प्राधिकरण निर्मितीसाठी ही तरतूद केली असून राज्यपातळीवरील हे महामंडळ असणार आहे. मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या विकसित करण्यासाठी सरकारने हा विचार केला आहे.
सरकारने केलेल्या या विचारासाठी आणि मराठा समाजाप्रती दाखविलेल्या प्रयत्नासाठी सरकारचे अभिनंदन करण्यात येणार आहे. यासाठी धर्मवीर संभाजी चौकात सोमवारी सकाळी 11 वाजता संपूर्ण मराठा समाजातील बांधवांनी तसेच मान्यवर आणि नेत्यांनी राष्ट्रीय पक्षाची धोरणे बाजूला सारून केवळ मराठा समाज म्हणून एकत्रित येऊन सरकारचे अभिनंदन करण्यासाठी जमायचे आहे.
प्रत्येक समाज आपल्या समाजाचा उत्कर्ष करण्यासाठी प्रयत्नशील असतो. मराठा समाज शेती आणि इतर व्यवसायात गुरफटला आहे. कर्नाटकात मराठा समाज अल्पसंख्यांक आहे. सरकारने केलेली ५० कोटोनची तरतूद ही भविष्यातील काळात अधिकाधिक वाढवून मिळावी, मराठा समाजाच्या आर्थिक विकासासाठी सरकारने अशीच नवी धोरणे मंजूर करावीत, आणि मराठा समाजाची प्रगती व्हावी, या उद्देशाने उद्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास पक्षीय भेद विसरून मराठा समाज म्हणून एकत्रित येण्याचे आवाहन गुणवंत पाटील,शहर आमदार अनिल बेनके,शिवाजी सुंठकर,किरण जाधव, रमेश गोरल,सुनिल जाधव, रमाकांत कोंडस्कर, जयराज हलगेकर, विजय जाधव,अरुण कटांबळे, रवी कोकितकर, अजित जाधव, रवींद्र जाधव, यांनी केले आहे.