शहरातील वीरभद्रनगर येथे एका सव्वापाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वीरभद्र नगर परिसरात गेल्या 25 ऑक्टोबर रोजी रात्री एका नराधमाने सव्वापाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.
मुबारक मुल्ला या 33 वर्षीय युवकाने हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात भादवि 363, 376 (एबी), 506, 509 आणि पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
लैंगिक अत्याचाराची ही घटना उघडकीस येताच सोमवारी सायंकाळी त्या बालिकेला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मार्केट पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी पुढील तपास करीत असून फरारी आरोपीचा शोध घेतला जात आहे.