कबलापूर-गोकाक मार्गावर एका खासगी कंपनीत कामाला असणाऱ्या व्यक्तीचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. निशिकांत सुभाषराव दहीकांबळे (वय 31, सध्या रा. अंजनेय नगर, बेळगाव, मूळचा रा. उगीर, जि. लातूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी माळमारुती पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मारिहाळ पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत येणाऱ्या कबलापूर – गोकाक मार्गावरील क्रॉसवर अनोळखी व्यक्तीचा गळा चिरून खून करण्यात आल्याची माहिती मारिहाळ पोलिसांना देण्यात आली. यावरून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि मृतदेह ताब्यात घेतला.
अनोळखी म्हणून या मृतदेहाची निंद्य करून घेतल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. मृत व्यक्तीचे छायाचित्र शहरातील पोलीस स्थानकांना पाठविण्यात आले. दरम्यान मृत व्यक्तीच्या नातेवाइकांकडून निशिकांत बेपत्ता असल्याची तक्रार घेऊन माळमारुती पोलिसात दाखल झाले होते. यावेळी मृत व्यक्तीचा फोटो दाखविण्यात आल्याने अनोळखी म्हणून नोंद झालेल्या व्यक्तीचे नाव ओळखणे शक्य झाले.
निशिकांत हा बुधवारी रात्री ८ च्या दरम्यान कोणाचा तरी फोन आला असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. त्यानंतर रात्री उशीर झाल्यानंतरही तो घरी परतला नाही. त्यामुळे अंजनेय नगर येथे वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबियांकडून माळमारुती स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती.
मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेची नोंद मारिहाळ पोलीस स्थानकात करण्यात आली असून याप्रकरणी पोलीस निरीक्षक बी. एस. मंटूर, उपनिरीक्षक एल. जी. करीगौडर, मंजुनाथ बडिगेर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून पुढील तपास हाती घेतला आहे.
Please give details of this murder. Who did this and why?
please sir plsplsplspls