कार्तिक मासातील पौर्णिमेनिमित्त भोई गल्ली, बेळगांव येथील श्री कार्तिक स्वामी मंदिरांमध्ये रविवार दि. 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता अभिषेकासह पुजाविधि कार्यक्रम होणार असून दुपारी 12:36 वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुले असणार आहे.
भोई गल्ली, बेळगांव येथील श्री कार्तिक स्वामी मंदिर रविवार दि. 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:36 वाजल्यापासून सोमवार दि. 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असणार आहे. तरी भक्तांनी कार्तिक स्वामी दर्शनासह तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराच्या विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.
सदर श्री कार्तिक स्वामी मंदिर हे अतिशय प्राचीन मंदिर असून उत्तर कर्नाटकातील कार्तिक स्वामींचे जागृत देवस्थान म्हणून सुपरिचित आहे. पूर्वी हे देवस्थान म्हणजे एक छोटे मंदिर होते परंतु गेल्या 2000 साली जीर्णोद्धार करून प्रशस्त मंदिर उभारण्यात आले. त्यानंतर 2019 आली या मंदिराचा कळसारोहण कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला.
भोई गल्लीतील श्री कार्तिक स्वामी मंदिराच्या विश्वस्त समितीचे विद्यमान अध्यक्ष रतन कौजलगी हे असून विश्वस्तांमध्ये प्रवीण महिंद्रकर, सतीश चव्हाण, रवी सक्रेंनावर, उदय चव्हाण, आनंद राजण्णावर, प्रसाद कारेकर, विनायक मैलेश्वर, रणजीत चव्हाण आणि प्रसाद कोळवेकर यांचा समावेश आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला कृतिका नक्षत्राच्या मुहूर्तावर या कार्तिक स्वामी मंदिरांमध्ये पूजा, अभिषेक आदी धार्मिक विधी होऊन मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाते.