नैऋत्य रेल्वे खात्याने लॉक डाऊनच्या काळात केलेल्या दुरुस्तीमुळे आता लोंढा ते मिरज व वास्को ते लोंढा या दोन रेल्वेमार्गावरील रेल्वेची गती वाढणार आहे. या मार्गावर आता ताशी 100 ते 110 किलोमीटर वेगाने रेल्वेगाड्या धावू शकणार आहेत.
लोंढा ते मिरज व वास्को ते लोंढा या दोन रेल्वेमार्गावरील रेल्वे ताशी 100 ते 110 किलोमीटर वेगाने धावणार असल्यामुळे प्रवाशांना कमी वेळेत आपला प्रवास पूर्ण करता येणार आहे. लॉक डाऊनच्या काळात नैऋत्य रेल्वेने रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी बरीच मेहनत घेतली आहे. ज्या ठिकाणी रेल्वेची गती कमी होते अशी ठिकाणे शोधून गती वाढविण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत.
नैऋत्य रेल्वेच्या आयुक्तांनी नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणाद्वारे लोंढा ते मिरज यादरम्यान 180 कि. मी. तर सन्वोर्धम ते वास्को या दरम्यानच्या 19 कि. मी. अंतरामध्ये गती वाढवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
लोंढा ते मिरज व वास्को ते लोंढा यादरम्यान रेल्वेची गती वाढविण्यास परवानगी दिल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. एक्सप्रेस गाड्यांची गती वाढविण्यासाठी नैऋत्य रेल्वे प्रयत्नशील आहे.
लोंढा दरम्यान मोठे जंगल क्षेत्र असल्यामुळे गती वाढवणे कठीण जात होते, परंतु या समस्येवर देखील नैऋत्य रेल्वेने मात केल्यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवास आता जलद होणार आहे.