लॉक डाऊनमुळे निर्माण झालेल्या मंदीमुळे सध्या बाजारपेठेत म्हणावा तसा उत्साह दिसत नाही. कोरोना प्रादुर्भाव आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सध्या बाजारामध्ये तूरडाळीसह खाद्यतेल आणि चहा पावडर यांचे दर भडकले वाढले आहेत.
लाॅक डाऊननंतर सर्वच क्षेत्रांवर मंदीचे सावट आहे. बेळगांवची बाजारपेठ देखील त्याला अपवाद नाही. दिवाळी सणानिमित्त सध्या धान्य आणि किराणामालाच्या बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे.
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील डाळी आणि खाद्यतेल यांचे दर भडकले आहेत. विविध प्रकारचे साबण आणि खोबरेलसह अन्य तेलांचे दर एमआरपी असल्यामुळे ते स्थिर आहेत. त्याप्रमाणे मैदा रवा व इडली रवा यांचे घर 30 रुपये प्रति किलो सइतके स्थिर आहेत. तांदळाचा दर वाढलेला नाही मात्र तूर डाळ हरभरा डाळ उडीद डाळ मूग डाळ वगैरे कडधान्याचे दर वाढले आहेत. साखरेच्या दरातही तशी फार मोठी वाढ झालेली नाही सध्या साखर प्रति किलो 37 रुपये आणि उपलब्ध आहे.
रिटेल मार्केटमध्ये गहू आणि जोंधळ्याचे प्रति किलो दर जवळपास समान आहेत. येथे सध्या बार्शी जोंधळा 60 रु. प्रति किलो आणि विजापूर जोंधळा 40 रु. प्रति किलो इतका आहे. चहा पावडर यांचे दर वाढले असून खाद्यतेल देखील प्रति लिटर जवळपास 100 रु. होते ते 115 ते 120 रु. झाले आहे. पाम तेलाचा दर 95 रु. प्रति लिटर आहे.
होलसेल मार्केटमध्ये सध्या गव्हाचा दर प्रति किलो 29 आणि 31 रुपये प्रतिकिलो इतका आहे. याप्रमाणे साखरेचा दर 34 व 80 रु. प्रति किलो आहे. सध्या तूरडाळीचा दर प्रति किलो 105 रु. झाला असून हरभरा डाळ 71, मुगडाळ 98, मसूरडाळ 70, मुगडाळ 85, मटकी 100 आणि मसूर (जवारी) 109 रु. प्रति किलो झाली आहे. जोंधळा प्रति किलो 50 40 व 52 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.