Thursday, May 2, 2024

/

अरे… गेला बॉल कुणीकडे!

 belgaum

कोरोनाचे चेपलेले भय,दिवाळीची पडलेली सुट्टी कोविड काळात चार भिंतीच्या आत दबून राहिलेलें निःश्वास धावणारी मोकळी मन आणि खेळाविषयीची प्रचंड आसक्ती याचा समुचित परिणाम बेळगावातील मैदानात दिसू लागला आहे.

खेळणाऱ्यांना आता मैदानेदेखील अपुरी पडू लागली आहेत वडगांव येथील आदर्श विद्या मंदिराच्या मैंदानात 16 ते 17 खेळपट्ट्या जमवण्यात आल्या होत्या. एका बाजूला जिथं फलंदाजी करत होता, तिथून दुसऱ्या खेळातला खेळाडू गोलंदाजी टाकत होता एकाच दिशेला वेगवेगळ्या फलंदाजांनी फटकवलेल्या चेंडू मागे वेगवेगळे पाच सहा खेळाडू धावताना दिसत होते.

आकाशात उडालेला झेल कधी कधी कोणत्या बॅट्समनने टोलावला हे देखील कळत नव्हते.झालेला अपील कोणत्या खेळाडूसाठी आहे हे देखील समजत नव्हते तरी खेळणाऱ्यांच्या एकाग्रतेत अजिबात खंड न पडता तितकेच रममाण होऊन प्लेयर्स क्रिकेटचा आनंद लुटत होते.Cricket playing boys

 belgaum

मोबाईल वरच्या गेम मधून,ऑनलाइन अभ्यासा मधून तरुणाई मैदानात उतरली घाम गाळत मैदानी खेळ खेळू लागली मातीशी त्यांचं नात परत जुळू लागलं एकमेकांशी संवाद होऊ लागले खेळामुळे माणसाला माणुसकीची जाणीव होते हे मुळे अधोरेखित झाले आहे.संवाद, श्रम ,व्यायाम,सजग बुद्धीचा कस या सर्वाचा परत तरुणाई कडून वापर होताना बघून नागरिकांतून मात्र समाधान होताना दिसत होते.

प्रेक्षकांविना आय पी एल चे सामने टी व्ही वर चालत असताना चैतन्याने भारून गेलेली मैदान बघून क्षण काळ का होईना देश कोरोनामुक्त झालाय असे वाटत होते.काही बघणारे प्रेक्षक या खेळाचा मनमुराद आनंद लुटत होते पण कधी कधी फलंदाजाने पटकावलेला चेंडू या भाऊ गर्दीत मिसळून जात होता आणि प्रेक्षक म्हणत होते… अरे गेला बॉल कुणीकडे!

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.