मराठा विकास प्राधिकरण स्थापनेच्या घोषणेननंतर कन्नड संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला होता. या पाठोपाठ आता वीरशैव लिंगायत विकास प्राधिकरणाचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
राज्यात वीरशैव लिंगायत समाजातील नागरिकांची संख्या अधिक आहे. हा समाज आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे. या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कर्नाटक वीरशैव लिंगायत विकास प्राधिकरणाची स्थापना होणे अत्यावश्यक असल्याचे जाणवताच तात्काळ या प्राधिकरणासाठीचे आदेश आज मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मराठा विकास प्राधिकरण स्थापनेच्या घोषणेनंतर वीरशैव लिंगायत समाजातील नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना पात्र लिहिले होते. या पत्रात वीरशैव लिंगायत समाजाच्या विकासासाठी वीरशैव लिंगायत विकास प्राधिकरणाची मागणी करण्यात आली होती.
माजी मंत्री एम. बी. पाटील, बसवराज होरट्टी यांच्यासह अनेक नेत्यांनी हे पात्र पाठविण्यासाठी पुढाकार घेतला होता. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक वीरशैव लिंगायत विकास प्राधिकरणाच्या स्थापनेचे आदेश दिले आहेत.