Saturday, January 11, 2025

/

ग्रीन क्रॅकर्स” फटाक्यांच्या विक्रीस परवानगी : मुख्यमंत्री येडीयुरप्पा

 belgaum

दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाचे संकट लक्षात घेऊन फटाक्यांच्या विक्रीवर बंदीचा आदेश देणाऱ्या मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कांही तासातच आपला निर्णय बदलताना आवाज विरहित “ग्रीन क्रॅकर्स” फटाक्यांच्या विक्रीस परवानगी दिली आहे.

मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत बोलताना कोरोनाचे संकट लक्षात घेऊन तसेच श्वसन संसर्ग संबंधित लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दीपावलीप्रसंगी आवाज विरहित ग्रीन क्रेकर्स फटाक्यांच्या विक्रीस परवानगी देण्यात आल्याचे जाहीर केले आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन आम्ही फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली होती.

परंतु राज्यातील बहुसंख्य लोकांनी केलेल्या विनंतीवरून आम्ही आमचा निर्णय बदलला आहे. फटाके नसतील तर दिवाळी कशाला म्हणायची? असा लोकांचा सवाल असल्यामुळे आम्ही आवाज विरहित ग्रीन क्रॅकर्स फटाक्यांच्या विक्रीला परवानगी दिली आहे, असे सांगून जनतेने स्वतःची आणि आपल्या मुलांची काळजी घेऊन साधेपणाने यंदाचा दिवाळी सण साजरा करावा असे आवाहन मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी केले आहे.

राज्याच्या आरोग्य खात्याच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या सूचनेवरून मुख्यमंत्र्यांनी काल राज्यात दिवाळीनिमित्त होणाऱ्या फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आल्याचा आदेश जारी केला होता. मात्र आता स्वतःच त्यांनी “ग्रीन क्रॅकर्स” या फटाक्यांच्या विक्रीस परवानगी दिली आहे. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रीसर्च (सीएसआयआर) आणि नॅशनल इनव्हाॅर्नमेंटल इंजीनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (एनइईआरआय) यांच्याकडून या आवाज विरहित ग्रीन क्रॅकर्स फटाक्यांचे उत्पादन केले जाते. ज्यामध्ये लिथियम, आर्सेनिक, शिसे अर्थात लेड आणि बेरियम या अपायकारक रासायनिक पदार्थांचा अंश नसतो.

ग्रीन क्रेकर्स या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ध्वनिप्रदूषण तर होतच नाही शिवाय बाष्प निर्माण होऊन धुळीचे कण खाली बसतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास ग्रीन क्रेकर्समुळे धुली प्रदूषण फारसे होत नाही. सेफ वॉटर रिलीजर (एसडब्ल्यूएएस), सेफ मिनिमल ॲल्युमिनियम (एसएएफए) आणि सेफ थर्माईट क्रॅकर (स्टार) अशा तीन प्रकारात “ग्रीन क्रॅकर्स” हे फटाके बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.