बेळगाव शहर आणि परिसरातील घडामोडींचा सर्वात वेगवान आढावा घेणारे बेळगावमधील नंबर वन वेबन्यूज चॅनेल म्हणजेच ‘बेळगाव लाईव्ह’! बेळगाव लाईव्हचे फेसबुक पेज ठरलं एक लाख फॉलोवर्स असणार बेळगावचं पाहिलं मराठी वेब न्यूजचॅनेल.
जानेवारी २०१७ पासून बेळगावकर माणसाचं हक्काचं माध्यम म्हणजेच बेळगाव लाईव्ह. बेळगाव लाइव्हच्या फेसबुक पेजने आज तब्बल १ लाख फॉलोवर्सचा टप्पा गाठला आहे.
बेळगाव लाईव्ह वर दाखविलेले प्रेम आणि विश्वास हा अमूल्य आहे. ‘बेळगावच्या डिजिटल मीडियामधील ‘बेळगाव लाईव्ह’ हे सर्वात जास्त स्बस्क्रायबर्स असणारे बेळगावचे एकमेव मराठी वेब चॅनेल ठरले आहे.
गेल्या चार वर्षांपासून सातत्याने बेळगावमधील प्रत्येक घडामोडी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य बेळगाव लाइव्हने केले आहे. बेळगाव आणि परिसरातील जनतेच्या समस्या, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनांचा वेगवान आढावा, सीमाप्रश्न, बेळगावचे राजकारण तसेच अनेक समस्यांना वाचा फोडून प्रशासकीय यंत्रणेला त्या समस्यांचे निराकरण करायला भाग पाडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार म्हणजे ‘बेळगाव लाईव्ह’
आमच्या वेब चॅनेलच्या माध्यमातून अनेक खेळाडू,गरजू आणि वंचितांना प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या तसेच अनेक गरजूंना न्याय मिळवून देणाऱ्या ‘बेळगाव लाईव्ह’वर वाचकांनी भरभरून प्रेम केले. बेळगावमधील प्रत्येक घडामोडी सर्वसामान्यांपर्यंत चुटकीसरशी पोहोचविणाऱ्या वेब चॅनेलने वेब पोर्टलसाहित फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या माध्यमातून अनेक वाचकांपर्यंत आपली ओळख निर्माण केली आहे. अनेकविध वैशिष्ट्ये, आणि अनेक पडद्यामागील कलाकारांसाठी व्यासपीठ निर्माण करत ‘बेळगाव लाईव्ह’ ने अनेकाकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. हे सर्व शक्य झाले ते वाचक, हितचिंतक आणि दर्शकांच्या विश्वासामुळे आणि आमच्यावर केलेल्या प्रेमामुळे.
यापुढील काळातही यशाचे अत्युच्च शिखर गाठण्यासाठी आम्हाला आपल्या अशाच विश्वासाची आणि साठीची आणि प्रेमाची गरज आहे. येणाऱ्या काळातही आमच्या माध्यमातून सडेतोड आणि प्रत्येक गोष्टींचा आढावा आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा मानस आहे. आपण दिलेल्या शुभेच्छा आणि प्रेरणा यापुढील काळातही आमच्यासोबत अशाच रहाव्या, हि अपेक्षा.
आपला
प्रकाश बेळगोजी,
संपादक आणि टीम बेळगाव live