जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत पिण्याचे पाणी, शौचालयाची तातडीने व्यवस्था करावी, तसेच प्रत्येक अंगणवाडी केंद्रात वीज जोडणी करण्यात यावी. विद्युत जोडणीसाठी विशेष अभियान हाती घेण्यात यावे, अशा सूचना प्रभारी जिल्हा सचिव आणि ग्रामविकास, पंचायत राज विभागाचे प्रधान कार्यदर्शी एल. के. अतिक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हा पंचायत सभागृहात गुरुवारी प्रगती आढावा बैठक आयोजिण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते.
पाणी, शौचालय आणि वीज जोडणीसाठी ग्रामपंचायतींनी आवश्यक ती मदत देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. सध्या टीव्हीवर शाळेतील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम प्रसारित केला जात आहे. परंतु अनेक घरातून टीव्ही संच उपलब्ध नाही. यामुळे विद्यार्थ्यांना अनुकूल होईल, यापद्धतीने पंचायत आवरणात टीव्हीची व्यवस्था करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. ग्रामपंचातींनीही विद्यार्थ्यांचा शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती पाऊले उचलावीत, अनुदानाच्या लाभातून मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करावी, असे निर्देश एल. के. अतिक यांनी दिले.
जलजीवन मिशन कामकाजाला त्वरित आरंभ करावा, शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या युनिटना चालना द्यावी, देखभाल तसेच दुरुस्ती असलेल्या युनिटचे कामकाजही त्वरित सुरु करावे. वैयक्तिक शौचालय निर्मितीची मुदत संपलाय असून उर्वरित कामकाज लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. त्याचप्रमाणे सार्वजनिक शौचालयांच्या निर्मितीसाठीही प्राधान्य देण्यात यावे. देवस्थान, बसस्थानक अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शौचालयांची निर्मीती करण्यात यावी अशा सूचना त्यांनी दिल्या.
भूगर्भातील पाणी पातळी वाढविण्यासाठी भूगर्भशास्त्रज्ञांचा सल्ला घेण्यात यावा. पावसाचे पाणी किंवा पाणी जिरवण्यासाठी योग्य ते क्रम घेण्यात यावेत, अशा सूचना त्यांनी जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांना दिल्या. हि योजना यशस्वी झाल्यास ग्रामपंचायतींना पुढील काळात या योजना राबविण्यासाठी मुदत देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. ही योजना यशस्वी झाल्यास पिण्याच्या पाण्याचा स्रोत उपलब्ध होईल आणि उन्हाळ्याच्या दिवसात पाणी टंचाईची समस्या उद्भवणार नाही, असे ते म्हणाले. नरेगा अंतर्गत सुरु असलेल्या कामकाजावर त्यांनी समाधान व्यक्त केले असून निपाणी, बेळगाव, कागवाड तालुक्यात वैयक्तिक प्रगती साधण्यासाठी सुविधा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याव्यतिरिक्त अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानभरपाईविषयी तसेच सहकार क्षेत्राच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या योजना, शेतकऱ्यांच्या समस्या, शाळा आणि अंगवडीच्या समस्या या गोष्टींचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीला अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, चिक्कोडी विभागाधिकारी युकेश कुमार, बैलहोंगल उप विभागाधिकारी शिवानंद भजंत्री, बेळगाव उपविभागाधिकारी अशोक तेली यांच्यासह जिल्हा पंचायतीचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हास्तरीय अधिकारी, तालुका पंचायत कार्यनिर्वाहक आणि इतर उपस्थित होते.