Friday, May 10, 2024

/

वातावरण ढगाळ.. हवेत गारठा

 belgaum

तमिळनाडूत आलेल्या चक्री वादळाच्या परिणामांमुळे बेळगाव शहर परिसरात देखील ढगाळ वातावरण निर्माण झाले असून थंडीत देखील वाढ झाली आहे.सध्या नोव्हेंबर महिना सुरू असला तरी म्हणावी तेवढी थंडीत वाढ झाली नाही अधून मधून होत अवकाळी यामुळे ऋतूंचे चक्रच बदलत चालले आहे.

बेळगाव तालुक्यात बहुतांश ठिकाणी भात कापणी व मळण्या जोरात सुरू आहेत या पाश्र्वभूमीवर ढगाळ वातावरण शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा विषय आहे.

नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी हे तीन महिने हिवाळ्यात बेळगावात कडाक्याची थंडी घेऊन येतात मात्र यावर्षी नोव्हेंबर संपायला आला तरी वादळ कमी होताना दिसत नाही आहे.रब्बी मोसमातील चनी,हरभरा,वाटाणा आणि जोंधळा गहू या मंजावर येणाऱ्या पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.Cold belgaum

 belgaum

एकूणच नोव्हेंबरच्या समाप्तीला देखील चक्री वादळ आल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.शुक्रवारी रात्री बेळगाव शहराचे 21 डिग्री सेंटिग्रेत होते.सकाळचे 8 वाजले तरी सूर्य देवाने दर्शन दिले नव्हते वातावरणात कमालीचा गारठा असून गुलाबी थंडी देखील पसरली आहे एकंदर बेळगाव गरिबांचे महाबळेश्वर वाटत आहे.

थंडीच्या परिणामाने प्रभात फेरीस बाहेर पडणाऱ्या मॉर्निंग वाकर्सना थंडीचा फटका बसत आहे सकाळी फिरायला जाणारे उबदार कपडे घालणे पसंत करत आहेत.ओल्ड पी बी रोड, किल्ला, यरमाळ,धामणे येळ्ळूर रोड,शहरातील अनेक मैदाने, वॅक्सिंन डेपो,हनुमान नगर,रेस कोर्स या जागा मॉर्निंग वाकर्सनी फुलू लागल्या आहेत.

बेळगावात एका वेगळ्या प्रकारच्या वातावरणाने बेळगाव मात्र विलोभनीय दिसत आहे.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.