Thursday, May 2, 2024

/

मुस्लिम समाजाला उमेदवारी नाही : ईश्वरप्पा

 belgaum

बेळगाव मधील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मुस्लिम समाजाला उमेदवारी आपण देणार नाही, असे खळबळजनक वक्तव्य ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी केले आहे. बेळगावमधील प्रवासी मंदिरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

दिवंगत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या आकस्मिक निधनानंतर बेळगावमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीच्या चर्चा जोरदार रंगू लागली. अंगडी यांच्या निधनानंतर अवघ्या काही तासाच्या आतच पोटनिवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या. दरम्यान, या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली. राजकीय वर्तुळात परस्परविरोधी हेवेदावे करण्यात येऊ लागले.

भाजपाच्यावतीने या हागेवर कोणता उमेदवार उभा करण्यात येईल? हा प्रश्न पुढे येऊ लागला. दरम्यान अनेक राजकीय वर्तुळातील मान्यवरांनी या निवडणुकीसाठी इच्छा दर्शविली. आज प्रवासी मंदिर येथे झालेल्या बैठकीनंतर ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी या निवडणुकीतील उमेदवाराबाबत एक नवे वक्तव्य केले आहे.

 belgaum

या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून एकवेळ शंकराचार्यांच्या शिष्याला, चन्नम्मानच्या शिष्याला किंवा रायणांच्या शिष्याला उमेदवारी देऊ परंतु मुस्लिम समाजाला पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळणार नाही, असे खळबळजनक वक्तव्य मंत्री ईश्वरप्पा यांनी केले आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी कोणाला द्यायची हे पक्ष ठरवेल, आम्ही हिंदुत्ववाद्यांना तिकीट देऊ परंतु मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव एन.आर. संतोष यांच्या आत्महत्येबाबत प्रतिक्रिया देताना मंत्री ईश्वरप्पा म्हणाले, राज्यात 1 कोटीहून अधिक भाजपा सदस्य आहेत. संतोष यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला हे आपल्याला माहित नाही. त्यांच्या वैयक्तिक समस्या शेकडो असतील, याबाबत आपल्याला काहीही माहित नाही. संतोष यांच्यावर कोणता राजकीय दबाव आहे याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहेत. परंतु त्यांच्या आत्महत्या करण्याचा आणि पक्षाचा काहीही संबंध नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव एन.आर. संतोष यांच्या आत्महत्येमागे राजकीय दबाव असल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला असून या राजकीय दबावापोटीच त्यांनी त्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप डी. के. शिवकुमार यांनी केला होता. डी के. शिवकुमार यांच्या विधानाचा समाचार घेत या व्हिडिओत संदर्भ आलेले आमदार आणि खासदार नेमके कोण आहेत? याचा आपण शोध घेऊ परंतु त्या आधी तो व्हिडीओ आम्हाला दाखवा. मुख्यमंत्र्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी हे तंत्र वापरात आणत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.