देशभरातील मशिदींवरील स्पीकर्स (भोंगे) लवकरात लवकर काढून टाकण्यात यावेत असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांनीदेखील हा आदेश बजावला आहे. तें व्हा बेळगांव शहर परिसरातील मशिदींवरील स्पीकर्स तात्काळ खाली उतरवले जावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने दिला आहे.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे जिल्हा अध्यक्ष भावकाण्णा लोहार आणि विहिंपीचे कार्यकारी अध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. देशभरातील मशिदींवरील स्पीकर्स (भोंगे) लवकरात लवकर काढून टाकण्यात यावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांनीदेखील हा आदेश बजावला आहे. तेंव्हा बेळगावच्या जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाने खास करून पोलीस आयुक्तांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांनी काढलेल्या आदेशाचे पालन करून शहर परिसरातील मशिदींवरील स्पीकर्स लवकरात लवकर खाली उतरवावेत असा विनंतीवजा मागणीचा तपशील विहिंप आणि बजरंग दलाच्या निवेदनात नमूद आहे.
आपल्या मागणी संदर्भात बोलताना बजरंग दलाचे जिल्हा अध्यक्ष भावकाण्णा लोहार म्हणाले की, बेळगांवच्या पोलिस आयुक्तांनी राज्याच्या पोलिस आयुक्तांच्या आदेशाचा आणि भारतीय संविधानाचा मान राखून अल्पावधीत शहर परिसरातील मशिदींवरील स्पीकर्स खाली उतरवावेत ही आमची त्यांना कळकळीची विनंती आहे.
परंतु दुर्दैवाने असे न झाल्यास विहिंप व बजरंग दल संपूर्ण कर्नाटकात टिपू जयंतीच्या वेळी जसे आंदोलन झाले तसे तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी दिला. याप्रसंगी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे बहुसंख्य कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालय आवारात उपस्थित होते.