केंद्र व राज्य सरकारने कोरोना महामारी पासून वाचण्यासाठी बरेच प्रयत्न सुरू केले आहेत. 2020 मध्ये कोरोना महारीचा मुळे अनेकांचे दिवस वाईट आले आहेत. मात्र सध्या या महामारी पासून वाचण्यासाठी राज्य सरकारने मास्क कंपल्सरी केले आहे. मात्र त्याची अंमलबजावणी बेळगावात दिनांक 7 ऑक्टोंबर पासून मास्क कंपल्सरी करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे जर कोणीही मास्क वापरत नसेल तर संबंधितावर एक हजार रुपये दंड लावण्यात येईल असा आदेश बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. के त्यागराजन यांनी एका पत्रकाद्वारे काढला आहे.
शहरात एक हजार तर ग्रामीण भागात पाचशे रुपये दंड वसूल केला जाणार आहे.नुकतेच एका पत्रकाद्वारे ही माहिती प्रसिद्ध झाली असून यापुढे दिनांक 7 ऑक्टोंबर पासून जे कोणी मास्क घालणार नाही त्यांना हजार रुपये दंड लावा असा आदेशच त्यांनी काढल्यामुळे यापुढे नागरिकांनी मास्क वापरणे हे गरजेचे ठरणार आहे.
मागील सहा ते सात महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे अनेक जण संकटात सापडले आहेत. मात्र याचे सोयरसुतक कोणालाच दिसून येत नाही. गर्दीच्या ठिकाणी अनेकजण मास्क वापरण्यात दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळेच या महामारीचा फैलाव बेळगाव शहरात आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी अनेकांना याची लागण झाली आहे तर अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे बेळगाव शहरात आता दिनांक 7 ऑक्टोंबर पासून मास्क कंपल्सरी करण्यात आले आहे.
त्यामुळे यापुढे जर विना मास्क भेटल्यास त्यांना हजार रुपये दंड बसेल यात शंका नाही. त्यामुळे यापुढे प्रत्येकाने गांभीर्याने लक्ष देऊन मास्क वापरावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे असा आदेश पोलीस आयुक्त डॉ. के त्यागराजन यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे.
त्यामुळे यापुढे फिरताना नागरिकांनी काळजी घ्यावी आणि मागचा वापर कंपल्सरी करावा असे बेळगाव लाईव्हच्या माध्यमातून करण्यात येत आहे. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या सूचनेचे पालन करावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे असेच मत व्यक्त होत आहे.