गोवावेस येथील लेक व्ह्यू हॉस्पिटलमध्ये उपचारा अंती कोरोना मुक्त होऊन एकाच दिवशी डिस्चार्ज मिळालेल्या “या” दोन रुग्णांमधील साम्य म्हणजे 104 ही संख्या होय.
सदर रुग्णांपैकी एक रुग्ण हा 104 वर्षीय गोकाक येथील वृद्ध सद्गृहस्थ असून दुसरा रुग्ण ही 104 किलो वजनाची सावंतवाडी येथील महिला आहे.
वयोवृद्धता आणि लठ्ठपणा या दोन्ही गोष्टी कोरोना संसर्गाच्या दृष्टीने जोखमीचे घटक आहेत. तथापि तीव्र इच्छाशक्ती, लढाऊ बाणा आणि वेळीच लवकर झालेले उपचार यामुळे हे दोन्ही रुग्ण नुकतेच पूर्णपणे कोरोना मुक्त होऊन घरी परतले.
या अगोदर के एल ई इस्पितळात देखील 90 वर्षीय रुग्ण कोरोनामुक्त झाले होते त्यांना डिस्चार्ज मिळाला होता जन सामन्यात त्यामुळे कोरोना बरा होऊ शकतो ही भावना देखील वाढू लागली आहे
लेक व्ह्यू हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर या दोन्ही रुग्णांना हॉस्पिटलच्या डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रेमाचा निरोप आणि शुभेच्छा दिल्या.