असं मानलं जातं की भय किंवा भीती ही एक पुरातन आणि आदिम भावना आहे. भीतीची अनेक रूपं असतात. लहान मुलांपासून अगदी प्रौढ, वृध्द व्यक्तींना सुध्दा कशाची ना कशाची तरी भीती वाटतच असते.
ईश्वरी संकल्पनेचा जन्मसुध्दा भीतीतून झाला असावा असे कित्येक अभ्यासकांचे म्हणणे असते. सशध्द माणूस जरा कमी प्रमाणात आजारी पडतो, कारण अशी माणसं आपला सगळा भार देवावर टाकून मोकळी होतात आणि मनावरची ओझी कमी करतात.
परंतु तथाकथित पुरोगामी वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या व्यक्ती मात्र मीपणाची ओझी बाळगत राहतात. असो. सांगायचा मुद्दा असा की लहान मुलांना वाटणारी अवास्तव भीती ही आजच्या लेखाचा विषय आहे.
भयगंड (ऋशरी उेाश्रिशु)- एखाद्या (एकाच) विषयाचे किंवा वस्तूचे किंवा व्यक्तीचे भय हे लहान मुलांमध्ये एक प्रकारचा काँम्प्लेक्स निर्माण करते. असुरक्षिततेची जाणीव, एकटेपणाची भावना, भावनिक पाठबळ नसणे, कौटुंबिक कलह, मानसिक विकार, पालकांचा मृत्यू, अपेक्षित संस्कारांचा अभाव यामुळे मुलांमध्ये विशिष्ट न्यूनगंड तयार होतात.
लक्षणे- अंधाराची भीती, भुताची भीती, रस्ता क्रॉस करण्याची भीती, अपरिचित व्यक्तीची भीती, लैंगिक विषयक भीती असे अनेकविध भीतीचे, भयगंडाचे प्रकार आढळून येतात.
भीतीमुळे हातपाय लटपटणे, भूक न लागणे, उलट्या जुलाब होणे, चक्कर येऊन पडणे, बोबडी वळणे, तोतरेपणा येणे, अनाहूत रडू फुटणे, भ्रमिष्ठावस्था येणे अशी लक्षणं दिसून येतात.
दहा वर्षाच्या श्रेयाला स्टेजची भीती फार वाटायची. तिचं वक्तृत्व चांगलं होतं. परंतु व्यासपीठावर जायचं म्हटलं की तोंडातून शब्दच फुटायचे नाहीत. ऐन स्पर्धेवेळी समारंभावेळी फजिती व्हायची. पण एरवी मात्र फर्ड वक्तृत्व! श्रेयाला पुष्पौषधी व होमिओपॅथीचा खूप फायदा झाला.
चौदा वर्षाचा शुभंकर! अभ्यासात अगदी अव्वल पण त्याच्या घरात काही कारणास्तव अशांतता होती. त्यामुळे असावं कदाचित पण त्याला परीक्षेची जाम भीती वाटायला लागली. परीक्षेला जायचं म्हटलं की उलट्या जुलाब सुरू व्हायचे, पूर्ण वर्षाच्या मेहनतीवर पाणी फिरायचं! शिवाय दोन वर्षात दहावीची परीक्षा! त्यालाही एका खास होमिओपॅथिक औषधानं उत्कृष्ट गुण आला. शिवाय समुपदेशनामुळे अपेक्षित परिणाम साधता आला.
सुलेखा बारा वर्षाची असताना वयात आली. त्यानंतर काय तिच्या मनात ठसलं होतं कोण जाणे, मुलांची पुरूषांची तिला भीती वाटायला लागली. रस्त्यातून जातानासुध्दा कोणी मुलं किंवा पुरूष दिसले की ही घाबरून घामाघूम व्हायची. प्रत्येकजण आपल्याविषयीच काहीतरी अचकट विचकट बोलत आहे. आपण असुरक्षित आहोत असं तिला वाटायला लागलं. शाळेत जाणं दूरच ती घराबाहेरही पडायला घाबरत होती. वडील आणि भाऊ यांच्याशी मात्र तिच वागणं नॉर्मल होतं. तर अशी कोडी होमिओपॅथीनेच सोडवता येतात. सुलेखाच्या घरातल्यांनाही खूप मनःस्ताप झाला. परंतु सुलेखा आता व्यवस्थित आहे. लग्नही झालं आहे आणि छानशी नोकरीसुध्दा करत आहे.
ही भीतीची उदाहरणे वाचताना काहीच वाटत नाही. परंतु भोगणारी व्यक्ती मात्र खूप खचलेली असते. त्यासाठी रूग्णाचे, रूग्णाच्या नातेवाईकांचे समुपदेशन करणे आवश्यक असते.
www.thebachflower.com
उपचार- मुलांची मानसिकता भयविरहित करण्यासाठी लहानपणापासून योग्य संस्कार करण्याची आवश्यकता असते. अगदी छोट्या बाळांनाही भीती दाखवून खाणे भरवले जाते. अकारण धाक दाखवला जातो. तसे न करता पुरेसा वेळ घेऊन मुलांना नीट समजावत खेळवत, खाणे भरवले पाहिजे. थोडीशी अध्यात्माची गोडीसुध्दा लहानपणापासूनच लावली पाहिजे. कुटुंबीयांचे, पालकांचे आचरण चांगले असावे मुलं अनुकरणाने शिकत असतात. शुध्द संस्कार, नीतिमत्ता, अध्यात्म, अभ्यास, पुरेसा खेळ, व्यायाम यातून माणूस घडत असतो. फक्त अंगचे चांगुलपण असून चालत नाही तर व्यवहारी दृष्टीकोनसुध्दा आवश्यक असतो.
बाकी होणारे आजार, विकार यांना निस्तरण्यासाठी आहेच होमिओपॅथी आणि फ्लॉवर मेडिसिन्स्, त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला मात्र जरूर घ्यावा. मात्र जरूर घ्यावा.
9916106896
9964946918