बेळगावमध्ये ईद – मिलाद, वाल्मिकी जयंती आणि कर्नाटक राज्योत्सव साजरा होत आहे.
या तीनही दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कर्नाटक अबकारी कायदा १९६५ २१(१) तसेच कर्नाटक पोलीस कायदा १९६३ (३१) अनुसार मधील तरतुदीनुसार येत्या ३० ऑकटोबरपासून १ नोव्हेंबर पर्यंत मद्यविक्रीला बंदी असणार आहे.
३० ऑकटोबर रोजी ईद मिलाद, ३१ ऑकटोबर रोजी वाल्मिकी जयंती, आणि १ नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सव आचरणात आणण्यात येणार आहे. ३० ऑकटोबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते २ ऑकटोबर रोजी सकाळी ६ पर्यंत मद्य विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. के. त्यागराजन यांनी दिले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल असेही, आदेशात नमुद केले आहे.