Sunday, January 5, 2025

/

नवरंगी नवरात्र!

 belgaum

अश्विन शुक्ल प्रतिपदा ते अश्विन शुक्ल नवमी या नऊ रात्रींमध्ये देवीची पूजा करून नवरात्र साजरी करतात. यंदा ही शारदीय नवरात्र 17 ते 25 ऑक्टोबर 2020 या दिवसांमध्ये साजरी होत आहे. तर विजया दशमी म्हणजे दसरा २५ ऑक्टोबर या दिवशी आहे. तरूणी आणि सुवासिनी स्त्रियांसह महिलावर्गामध्ये नवरात्रीचं एक प्रमुख आकर्षण असते ते म्हणजे नवरात्रीच्या नऊ रंगांचे!

स्त्रियांमधील ‘एकता’ एका अनोख्या पद्धतीने समोर आणण्यसाठी असलेली ही चलाखी आता फॅशन स्टेटमेंट झाली आहे. घटस्थापनेपूर्वीच अनेक महिला नवरात्रीच्या नऊ रंगांप्रमाणे कपड्यांची तयारी करून ठेवतात. मग यंदा तुमचीही नवरात्रीची तयारी सुरू झाली असेल..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रत्येक सण आणि उत्सवावर विरझन पडले आहे. परंतु ‘बेळगाव लाईव्ह’ च्या माध्यमातून हा उत्साह असाच टिकवून ठेवण्यासाठी ‘सेल्फी विथ बाप्पा’ प्रमाणे ‘नवरंगी नवरात्र’ हा उपक्रम राबवत आहोत.

तुमचा ग्रुप किंवा फॅमिली फोटो ला बेळगाव Live ला पाठवायचा आहे या उपक्रमात आपल्या छायाचित्राला ‘बेळगाव लाईव्ह’ वर प्रसिद्धी देण्यात येईल. फेसबुक /इंस्टाग्राम पेजवर आपला फोटो झळकेल व जगभर पोहोचेल.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपले छायाचित्र, आणि माहिती 9663773011व 9448351816 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवा.
तर पहा नवरात्रोत्सव 2020 मध्ये यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग आहे?
(नवरंगामागे शास्त्र नसून सणानिमित्त एकजूटीची भावना निर्माण करण्याचा हेतू आहे.)

१७ ऑक्टोबर – राखाडी (ग्रे)
१८ ऑक्टोबर – केशरी
१९ ऑक्टोबर – पांढरा
२० ऑक्टोबर – लाल
२१ ऑक्टोबर – निळा
२२ ऑक्टोबर – पिवळा
२३ ऑक्टोबर – हिरवा
२४ ऑक्टोबर – मोरपंखी
२५ ऑक्टोबर – जांभळा

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.